adivasi samaj calls for a bandh in pimpalner tommorrow  Saam Digital
क्राईम

Dhule News : आदिवासी संघटना एकवटल्या, 'त्या' घटनेच्या निषेर्धात उद्या पिंपळनेर बंदची हाक

भूषण अहिरे

आदिवासी महिलेवर झालेल्या अतिप्रसंगाच्या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेर्धात सर्व आदिवासी संघटनांनी उद्या (बुधवार) पिंपळनेर बंदची हाक दिली आहे. या बंद नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या परिसरात आदिवासी महिलेवर दोघा नराधमांनी अतिप्रसंग केला. या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

सर्व आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आज पिंपळनेर येथे या घटनेच्या निषेधार्थ बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान सर्व आदिवासी संघटनांनी उद्या (बुधवार) घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून सर्वच दुकाने व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

Weather Alert : पुण्यासह ९ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, तुफान पाऊस कोसळणार; वाचा वेदर रिपोर्ट

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT