Jalgaon Crime News  Saam Tv
क्राईम

Crime: कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला होता, टोळक्याकडून अमानुष मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime News: जळगावमध्ये २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. कॅफेमध्ये तरुणीसोबत गप्पा मारत बसले असता एका टोळक्याने त्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

जळगावमध्ये २१ वर्षांच्या तरुणाला टोळक्यांनी अमानुष मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. जळगावच्या जामनेर शहरात ही घटना घडली. सुलेमान रहीम खान (२१ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेमुळे जळगावमध्ये तणावाचे वातावरण आहे.

जळगावचे एसपी महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय सुलेमान खानचे १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून त्याला मारहाण करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर ५ आरोपी सध्या फरार असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.' जळगाव पोलिसांनी सांगितले की, सुलेमान खान वडीलांना शेतीच्या कामामध्ये मदत करायचा. तो काही कामानिमित्त गावापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या जामनेर येथे आला होता. जामनेरमधील एका कॅफेमध्ये तो मुलीसोबत बसला होता. त्याचवेळी काही जणांनी या दोघांना पकडले. त्यानंतर त्यांनी सुलेमानवर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली.

सुलेमान कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटला आणि तो आपल्या गावाकडे निघाला. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. बस स्टॉपवर थांबलेल्या सुलेमानला गाठत आरोपींनी परत लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुलेमान गंभीर जखमी झाला. सुलेमानला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर जळगावमध्ये खळबळ उडाली.सुलेमानच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांनी मोठ्यासंख्यने जामनेर पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आणि न्याय मिळावा अशी मागणी केली. आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली. जर आरोपींवर तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असे नागरिकांनी सांगितले. परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी जामनेरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT