Zelio E Scooter saam Tv
बिझनेस

Zelio E Scooter: 150 km धावणारी झेलीओ ई-मोबिलिटी कंपनीची स्कूटर लॉन्च, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Zelio E Scooter Launch: आकर्षक डिझाइन, सुधारित वैशिष्ट्ये आणि नवीन रंगांच्या पर्यायांसह, आकर्षक डिझाइन, सुधारित फीचर्स आणि नवीन रंगांच्या पर्यायांसह झेलीओ ई-मोबिलिटीने इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.

Bharat Jadhav

भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँडपैकी एक असलेल्या झेलीओ ई-मोबिलिटीने इलेक्ट्रिक स्कूटरचे बहुप्रतीक्षित फेसलिफ्ट मॉडेल अधिकृतपणे लॉन्च केले आहे. आकर्षक डिझाइन, सुधारित फीचर्स आणि नवीन रंगांच्या पर्यायांसह, हे फेसलिफ्ट केलेले लेजेंडर आधुनिक प्रवाशांसाठी डिझाइन केलंय.

काय आहे किंमत

नवीन लेजेंडर लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंट ६०व्ही/३०ए ची किंमत रु.७५,००० आणि ७४व्ही/३२ए ची किंमत रु.७९,००० तसेच जेल बॅटरी व्हेरिएंट ३२एएचची किंमत रु.६५,००० या तीन वेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ही स्कूटर २५ किमी/तास इतका सर्वाधिक वेग आणि एकाच चार्जमध्ये १५० किमी पर्यंतचा टप्पा गाठते.

ही स्कूटर उच्च-कार्यक्षमतेच्या ६०/७२व्ही बीएलडीसी मोटरने चालते. तर चार्जिंग होण्यासाठी कमी वीज लागते. प्रति चार्ज केवळ १.५ युनिट वीज लागत असते. ९८ किलो एकूण वजन, १५० किलो लोडिंग क्षमता आणि १७० मिमी ग्राउंड क्लिअरन्ससह, लेजेंडर दैनंदिन प्रवासाचे आव्हान सहजपणे पेलण्यासाठी डिझाइन केले आहे.

चार्जिंग वेळ मॉडेलनुसार वेगवेगळी आहे; लिथियम-आयन मॉडेल्सना पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात, तर जेल बॅटरी मॉडेलला ८ तास लागतात. ही स्कूटर तीन आकर्षक नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रस्टी ऑरेंज, ग्लॉसी ग्रीन आणि ग्लॉसी ग्रे, या रंगात ही स्कूटर उपलब्ध असणार आहे. आमच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये लेजेंडर हे नेहमीच विश्वसनीयता, कार्यक्षमता आणि स्टाइलचे प्रतीक राहिले आहे.

या फेसलिफ्ट मॉडेलसह, आम्ही शहरी प्रवासाचा अनुभव कसा असावा, याची नव्याने कल्पना केली आहे, असं झेलीओ ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. कुणाल आर्य म्हणाले

नवीन लेजेंडर सुरक्षा, आराम आणि दैनंदिन सुविधा अपग्रेड्स करण्यात आले आहेत. यात पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक, ९०/९०-१२ टायर्ससह १२-इंच अलॉय व्हील्स आणि सुरळीत व स्थिर राइडसाठी शक्तिशाली रिअर हब मोटर आहे. पुढील टेलिस्कोपिक आणि मागील ड्युअल स्प्रिंग-लोडेड सस्पेन्शन (झटके सहन करणारी यंत्रणा) खडबडीत रस्त्यांवरही आरामदायी प्रवासाची खात्री देते. स्टायलिश एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प आणि इंडिकेटर्स तिच्या आधुनिक आकर्षणात भर घालतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT