Vivo Y400 Pro 5G
Vivo Y400 Pro 5G Sale Date saam Tv

Vivo Y400 Pro 5G: खूशखबर! Vivo Y400 Pro 5Gची विक्री होणार सुरू, जाणून घ्या फोनची किंमत आणि शानदार फीचर्स

Vivo Y400 Pro 5G Sale Date: भारतात विओ 400 प्रो 5जीला लॉन्च करण्यात आले आहे. या फोनची विक्री 27 जूनपासून सुरू होणार आहे.
Published on

आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनीने Vivo च्या Y400 सीरिजमध्ये अजून एक नवीन मॉडेल आणलाय. Vivo Y400 Pro 5G भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची बॅटरी आणि कॅमेरा सुपर आहे. तुम्ही हा मोठा डिस्प्ले असलेला Vivo Y400 Pro 27 जूनपासून खरेदी करू शकता. या फोनची फीचर्स कोणती आहेत. तो कोणत्या ऑफर्ससह कुठे उपलब्ध आहे हे जाणून घेऊ.

Vivo Y400 Pro 5G ची विक्री 27 जून 2025 पासून सुरू होत आहे. या फोनचे दोन प्रकार आहेत, यातील पहिला फोन - 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला आहे. तर दुसरा प्रकार 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेला आहे. 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. Vivo Y400 Pro मध्ये तीन रंगाचे पर्याय आहेत - पांढरा, सोनेरी आणि जांभळा या तीन रंगात हा हॅण्डसेट येईल.

Vivo Y400 Pro 5G
Government Scheme: महिलांसाठी सुवर्णसंधी; मोफत पीठ गिरणी योजना सुरू, असा करा अर्ज

Vivo Y400 Pro प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकाल. Vivo Y400 Pro 5G Amazon, Flipkart आणि Vivo India साइटवर उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन रिटेल स्टोअर्समधून ऑफलाइनदेखील खरेदी करू शकता.

Vivo Y400 Pro 5G
Tesseract स्कूटरचा मार्केटमध्ये जलवा; बुकिंग फूल, काय आहेत बाईकचे फीचर्स आणि किंमत

Vivo Y400 Pro 5G च्या किमतीवर सूट मिळवण्यासाठी तुम्ही बँक कार्ड ऑफर वापरू शकता. निवडक कार्डवर सूट दिली जात आहे. IDFC First Bank, SBI कार्ड, DBS बँक सारख्या बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर सूट दिली जात आहे. पेमेंटवर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

Vivo Y400 Pro 5G Specifications काय आहेत फीचर्स

Vivo Y400 Pro 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊ. यात 2392 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.77-इंचाचा HDR10+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस स्क्रीन आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड 15वर आधारित FuntouchOS 15 सह येतो. यात 5500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com