Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Rent Or Buy House Calculation: घर खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा भाड्याच्या घरात राहणे की स्वतः चे घर घेणे योग्य असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
Rent Or Buy Home
Rent Or Buy HomeSaam Tv
Published On
Summary

घर खरेदी करणे की भाड्याच्या घरात राहणे

ईएमआय की भाडे भरणे काय योग्य

घर खरेदी करतानाचे संपूर्ण गणित जाणून घ्या

प्रत्येकाचे स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न असते. परंतु सध्या घरांच्या किंमती खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे घर खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजण भाड्याच्या घरात राहण्यास पसंती देतात. दरम्यान, भाडे देणे की ईएमआय भरणे जास्त सोयीचे असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असतो. दरम्यान, दोन्ही गोष्टींमध्ये कोणती गोष्ट जास्त फायदेशीर ते जाणून घ्या.

Rent Or Buy Home
House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही १ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला त्यावर ८० लाखांचे होम लोन केले. यावर तुम्हाला जर ९ टक्के व्याजदर भरावे लागले तर तुम्हाला महिन्याला ७२,००० रुपये ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला २० वर्षात १,७३ कोटी रुपये भरावे लागणार आहे. जर तुमच्या घराची किंमत १ कोटी असेल तर उरलेले ७३ लाख रुपये व्याजदरात जातात. परंतु जर तुम्ही याच व्याजराच्या रक्कमेत तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकतात.

सोशल मीडियावर सीए नितीन कौशिक यांनी सांगितले की, घर खरेदी करणे हा भावनिक निर्णय असतो. लोक म्हणतात किती काळ भाड्याच्या घरात राहायचं म्हणून निर्णय घेतात. परंतु हा निर्णय महागात पडतो. लोक त्यांची सर्व सेव्हिंग डाउन पेमेंटमध्ये जाते. त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य ईएमआय भरतात.

भाड्याच्या घरात राहणे हा पर्याय

सीए नितीन कौशिक यांनी सांगितले की, भाड्याच्या घरात मिळणारा परतावा ३.५ ते ५ टक्के असतो. जर तुम्ही १ कोटी रुपयांचे घर घेत असाल आणि त्याच घरात भाड्याने राहत असाल तर तुम्हाला २५-३० हजार रुपये भाडे भरावे लागेल. जर तुम्ही हीच रक्कम म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवली तर तुम्हाला २० वर्षांत खूप चांगला परतावा मिळतो. याचसोबत तुमच्या डोक्यावर कर्जाचा भारदेखील नसतो.

Rent Or Buy Home
Home Loan : गृहकर्जदारांसाठी खुशखबर! मोठ्या बँकांनी व्याज केलं कमी, EMI होणार स्वस्त

घाईघाईत निर्णय घेऊ नका

घर खरेदी करणे हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. घर खरेदी करताना नीट विचार करा. तुम्ही इमरजन्सी परिस्थितीत तुमच्याकडे आवश्यक पैसे आहेत की नाही त्याकडे आधी लक्ष द्या. जेणेकरुन घर खरेदी करताना डाउन पेमेंट केल्यानंतरही तुमच्याकडे काही ठरावीक रक्कम बचत म्हणून राहील.

Rent Or Buy Home
MHADA Homes: म्हाडाच्या घरांची आता लॉटरीशिवाय विक्री! पण कुठे? वाचा का घेतला निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com