Investment Tips: जास्त परताव्यासाठी किती वर्षांची FD करावी? व्याजावर TDS कसं मोजलं जातं, कर्ज कसं घेता येतं? समजून घ्या संपर्ण गणित

Interest On Fixed Deposit: कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव करताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कालावधी (टेन्योर), कारण जर आपण मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडली किंवा अंशतः पैसे काढले तर आपल्याला दंड भरावा लागतो.
 investment tips
Interest On Fixed Depositsaam tv
Published On

प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. बहुतेकजण इमरजेंसीच्या वेळासाठी काही ना काही सोय करून ठेवतात. जेव्हा आपल्याकडे एक रक्कम येते किंवा जास्त पैसा येतो तेव्हा आपण बचत करण्याचा विचार करतो. तर काही जण एफडीचा आपण विचार करतो. फिक्स्ड डिपॉजिट (FD) मध्ये बचत करणे हे प्रत्येक भारतीयांना चांगला पर्याय वाटतो. जर योग्य बँक आणि योग्य योजना ओळखल्या नाहीत, तर तुम्हाला पाहिजे तसा परतावा मिळत नसतो.

कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव करताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कालावधी (टेन्योर), कारण जर आपण मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडली किंवा अंशतः पैसे काढले तर आपल्याला दंड भरावा लागतो. जर मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडली तर १% पर्यंत दंड भरावा लागतो. यामुळे ठेवीवरील एकूण व्याजदेखील कमी होऊ शकते.

किती वर्षांची एफडी करावी?

कमीत कमी ५ वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट ठेवावी. ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी तुम्हाला चांगला परतावा देईल. जर तुम्ही ५ वर्षांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकरात सूट देखील मिळते. तुमच्या ठेवीवर आणि व्याजावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागत नाही.

एफडीवर तुम्हाला किती व्याज मिळते?

बहुतेक बँका सामान्य ग्राहकांना वार्षिक ७% दराने एफडीवर व्याज देतात. परंतु काही बँका आणि एनबीएफसी (नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या) ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% ते १% अतिरिक्त व्याज देऊ शकतात. म्हणजेच, वृद्धांना त्यांच्या ठेवींवर वार्षिक ७.५०% ते ८% व्याज मिळू शकते.

TDS कसं मोजलं जातं?

जर तुमच्या एफडीवर कोणत्याही एका आर्थिक वर्षात मिळालेले व्याज १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर १०% दराने टीडीएस कापला जाईल. जर तुम्ही पॅन दिलेला नसेल, तर २०% दराने कर कापला जाऊ शकतो.

किती कर्ज मिळते?

तुम्ही तुमच्या एफडीवर कर्ज देखील घेऊ शकता. तुम्हाला एफडीच्या मूल्याच्या ९०% पर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजेच, जर तुम्ही १.५ लाख रुपयांची एफडी केली असेल तर तुम्हाला १ लाख ३५ हजार रुपये कर्ज म्हणून मिळून शकते. तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा १-२% जास्त व्याज द्यावे लागेल. म्हणजेच, जर तुम्हाला मुदत ठेवीवर ४% व्याज मिळत असेल, तर तुम्हाला ५ ते ६% व्याजदराने कर्ज मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com