YAMAHA Saam Tv
बिझनेस

YAMAHA Bike Launch: स्पोर्टी लूक, जबरदस्त इंजिनसह ४ बाईक लाँच; किंमत किती? वाचा

YAMAHA XSR15, AEROX-E, EC-06, FZ-RAVE Launch: यामाहा इंडियाने भारतात ४ बाईक लाँच केल्या आहेत. यामध्ये दोन या ईव्ही आहेत. या नवीन बाईक स्पोर्टी लूक आणि जबरदस्त इंजिनसह लाँच केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज भारतात त्‍यांचा जागतिक स्‍तरावर प्रशंसित आधुनिक रेट्रो स्‍पोर्ट ब्रँड नवीन XSR155 च्‍या लाँचची घोषणा केली. कंपनीने आपल्‍या पहिल्‍या ईव्‍ही - AEROX-E व EC-06 देखील लाँच केल्या आहेत. यामाहाने नवीन FZ-RAVE सह आपला FZ पोर्टफोलिओ मजबूत केला आहे.

बाईकची किंमत

नवीन FZ-RAVE तरूण व डायनॅमिक राइडर्ससाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. XSR155 मधून मॉडर्न रेट्रो स्‍पोर्टसह डिझाइन करण्यात आली आहे. जी XSR सिरीजमध्ये येते. या बाईकची सुरूवातीची ऑफर म्‍हणून Rs. 1,49,990 (एक्‍स-शोरूम-दिल्‍ली) किंमत असलेली ही मोटरसायकल तरूण व परिपक्‍व राइडर्सचे लक्ष वेधून घेते.

XSR ही जागतिक स्‍तरावर यामाहाची XSR पुढची सीरीज आहे. जी क्‍लासिक स्‍टायलिश रंगसंगती व आधुनिक रचनेला एकत्र करत आधुनिक रेट्रो स्‍पोर्ट उत्‍साह व्‍यापून घेते. या मोटरसायकलमधील क्‍लासिक वक्राकार एलईडी हेडलाइट व टेललाइट, टीअरड्रॉप फ्यूएल टँक आणि LCD डिस्‍प्‍ले यामाहाच्‍या डिझाइन शैलीच्‍या कालातीत आकर्षकतेला दाखवतात.

XSR155

XSR ही जागतिक स्‍तरावर यामाहाची XSR सीरीजचा भाग आहे. या मोटरसायकलमधील क्‍लासिक वक्राकार एलईडी हेडलाइट व टेललाइट, टीअरड्रॉप फ्यूएल टँक आणि पारंपारिकरित्‍या स्‍टाइल एलसीडी डिस्‍प्‍ले यामाहाच्‍या डिझाइन शैलीच्‍या कालातीत आकर्षकतेला दाखवतात. वजनाने हलकी व संतुलित फ्रेमसह १७-इंच व्‍हील्‍स मोटारसायकलला देण्यात आली आहे.

यामाहाची XSR155 चार रंगांमध्‍ये येते - मेटलिक ग्रे, विविड लाल, ग्रेईश ग्रीन मेटलिक आणि मेटलिक ब्‍ल्‍यू, तसेच दोन विशिष्‍ट अॅक्‍सेसरीज पॅकेजेस् देखील आहेत - स्‍क्रॅम्‍बलर व कॅफे रेसर. XSR155 मध्‍ये १५५ सीसी लिक्विड-कूल्‍ड, ४-व्‍हॉल्‍व्‍ह इंजिनच्‍या शक्‍तीसह व्‍हेरिएबल व्‍हॉल्‍व्‍ह अॅक्‍च्‍युएशन (व्‍हीव्‍हीए) आहे, जे १३.५ KW शक्‍ती आणि १४.२ NM टॉर्क देते. यामाहाच्‍या प्रमाणित डेल्‍टाबॉक्‍स फ्रेमवर डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या

मोटरसायकलमध्‍ये अॅल्‍युमिनिअम स्विंग आर्म, अपसाइड-डाऊन फ्रण्‍ट फोर्क्‍स, लिंक्‍ड-टाइप मोनोक्रॉस रिअर सस्‍पेंशन आणि ६-स्‍पीड ट्रान्‍समिशनसोबत असिस्‍ट व स्लिपर क्‍लच आहे, तसेच, XSR155 मध्‍ये ड्युअल-चॅनेल एबीएस व ट्रॅक्‍शन कंट्रोल देखील आहे, ज्‍यामधून ग्राहाकंना सुरक्षित राइडची खात्री मिळते. डिझाइन, कार्यक्षमता व दैनंदिन व्‍यावहारिकतेच्‍या विनासायास संयोजनासह XSR155 राइडर व मशिनला संलग्‍न करण्‍याप्रती यामाहाच्‍या मोटरसायकलिंग तत्त्वाच्‍या पैलूला सादर करते.

AEROX-E ईव्ही

AEROX-E Performance EV यामाहाच्‍या उच्‍च-कार्यक्षम इलेक्ट्रिक स्‍कूटर श्रेणीमध्‍ये प्रवेशाला सादर करते. Aerox 155 च्‍या प्रबळ यशावर आधारित AEROX-E ईव्‍ही क्षेत्रात या यशाला अधिक प्रबळ करण्‍यास सज्‍ज आहे. ९.४ किलोवॅट (पीक पॉवर), उच्च प्रवेगासाठी ४८ एनएम टॉर्क इलेक्ट्रिक मोटर आणि ड्युअल डिटेचेबल ३ किलोवॅट तास बॅटरीद्वारे समर्थित, AEROX-E कार्यक्षम पॉवर व्यवस्थापनासह त्वरित प्रवेग प्रदान करते. असाधारण कामगिरीसाठी ड्युअल बॅटरी उच्च ऊर्जा प्रकारच्या सेलद्वारे समर्थित आहेत. यात सहज काढण्यासाठी आणि घरी चार्जिंगसाठी एर्गोनॉमिक ग्रिप्स देखील आहेत. यात अनेक रायडिंग मोड्स - इको, स्टँडर्ड आणि पॉवर - देखील आहेत - ज्यामध्ये 'बूस्ट' फंक्शनचा समावेश आहे ज्यामुळे रायडर्सना जलद प्रारंभ आणि मजबूत पिक-अपसाठी जलद प्रवेग मिळतो. अतिरिक्त रायडिंग सोयीसाठी EV मध्ये रिव्हर्स मोड देखील मिळतो.

FZ-RAVE- स्मार्ट, स्पोर्टी लूक

नवीन यामाहा FZ-RAVE यामाहा FZ-RAVE भारतातील १५०सीसी श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करते. या वेईकलमध्‍ये व्‍यावहारिकता व उत्‍साहाचा शोध घेत असलेल्‍या तरूण राइडर्ससाठी आक्रमक स्‍टायलिंग आणि शहरासाठी अनुकूल कार्यक्षमतेचे संयोजन आहे. यामाहाच्‍या प्रीमियम FZ लाइनमधून प्रेरणा घेत FZ-RAVE मध्‍ये आकर्षक फुल-एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍पसह एकीकृत पोझिशन लाइट, शिल्‍पाकृती फ्यूएल टँक, कॉस्‍मेटिक एअर व्‍हेण्‍ट्स आणि सुसंगत एक्‍झॉस्‍ट आहे, जे वेईकलला भारतातील रस्‍त्‍यांवर लक्षवेधक उपस्थिती देतात. या वेईकलच्‍या आधुनिक डिझाइनला पूरक सिंगल-पीस सीट आणि आकर्षक टेल लॅम्‍प आहे, जे वेईकलला आकर्षक व स्‍पोर्टी लुक देतात, ज्‍यामुळे ही वेईकल वाहतूकीमध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेते, तसेच दैनंदिन प्रवासामध्‍ये आणि लांबच्‍या प्रवासामध्‍ये राइडरला आरामदायीपणा देते. नवीन FZ-RAVE ची किंमत Rs. 1,17,218 (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast Video: दिल्ली स्फोटाचा पहिला VIDEO; लाल किल्ल्याजवळ सिग्नलवर कार आली अन् क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

Khaman Dhokla: घरच्या घरी बनवा सुरत स्टाईल मऊ , लुसलुशीत खमण ढोकळा

Maharashtra Live News Update: बोपोडी भूखंड अपहार प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा शितल तेजवानी यांचा दावा

राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? VIDEO

दिल्ली स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

SCROLL FOR NEXT