Dhanshri Shintre
बेंगळुरूस्थित ओबेन इलेक्ट्रिकने आपली रॉर ईझेड बाईक आता अॅमेझॉनवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
ओबेन रॉर ईझेड बाईकसाठी अॅमेझॉनवर ऑनलाइन बुकिंगची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.
ओबेन रॉर ईझेडच्या दोन मॉडेल्सपैकी एकाची किंमत ₹1,19,999 तर दुसऱ्याची ₹1,29,999 एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे.
या दोन्ही मॉडेल्सच्या किंमतींमध्ये कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या 20,000 रुपयांच्या सवलतीचाही समावेश करण्यात आला आहे.
बेस मॉडेलमध्ये 3.4 किलोवॅट बॅटरी मिळते, तर टॉप व्हेरियंटमध्ये 4.4 किलोवॅट क्षमतेची बॅटरी असते.
पूर्ण चार्ज केल्यानंतर बाईक 175 किमी धावते, तसेच यामध्ये जलद चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.
ओबेन रॉर इझी बाईकमध्ये जिओ फेंसिंग, थेफ्ट अलर्ट, युनिफाइड ब्रेक व ड्राइव्ह असिस्टसारखे स्मार्ट फीचर्स उपलब्ध आहेत.