
शैक्षणिक आणि बौद्धिक वाढीसाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. बदलत्या काळानुसार शाळेचं स्वरूप बदलत चाललं आहे. सध्या शाळांमध्ये फक्त शैक्षणिक शिक्षण नसून, विविध उपक्रम देखील राबवण्यात येतात. आपल्या मुलानं उत्तम शाळेत शिक्षण घ्यावं, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. शिक्षण, अॅक्टिव्हिटी या आकर्षक गोष्टी पाहून मुलं शाळेत रमतात, शिकतात. अशावेळी पालक अव्वाच्या सव्वा शुल्क भरून मुलांसाठी अॅडमिशन घेतात. पण जर शाळाच बोगस निघाली तर? असाच एक प्रकार शिक्षणाचे माहेरघर अर्थात पुण्यात घडला आहे.
रस्त्यावरून जात असताना पालक अनेक शाळांच्या जाहिराती बघत असातात. याच जाहिरातींना बळी पडून पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात, आणि नंतर शाळाच बोगस असल्याचं समोर येतं. पुण्यातील हडपसर येथील एका पालकाची अशीच फसवणूक झालीय. मॅरेथॉन इटंरनॅशनल शाळा बोगस असल्याचं उघड झालं आहे.
शाळेमध्ये प्रवेश घेताना, हॉर्स रायडिंग शिकवलं जाईल असं सांगण्यात आलं. प्रवेश घेताना चार घोडे शाळेने गेटसमोर आणले होते. मात्र, प्रत्यक्षात हॉर्स रायडिंग शाळेमध्ये नव्हतं. तेव्हा शाळेविरूद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, तेव्हा शाळेचा यु-डायस नंबर चुकीचा असल्याचं समोर आलं. पालकांनी ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं काय? त्यांच्या भवितव्याचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चुकीची जाहिरात करून पालकांची फसवणूक केल्यास आणि पालकांच्या निदर्शनास आल्यास त्या संबंधित संस्था अथवा शाळेच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिलाय. संबंधित कार्यक्षेत्रातील गटशिक्षणाधिऱ्यांनी त्या शाळांच्या कृतीकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असेही नाईकडे यांनी स्पष्ट केलं. तर हडपसर मधील मॅरेथॉन शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
सध्या शाळांच्या प्रवेशाबाबतच्या अनेक जाहिराती सुरू झाल्याचे दिसत आहे. त्या जाहिरातींच्या माध्यमातून पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी १६ ते १८ डिसेंबरदरम्यान, www.zppune.org या वेबसाइटवर शाळांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार मुलांसाठी शाळेची निवड करा. असं सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.