New Scooter Launch: यामाहा Aerox 155 चा MotoGP एडिशन लॉन्च, स्वस्त E20 पेट्रोलवरही धावणार

Yamaha Aerox 155 MotoGP Edition: यामाहा Aerox 155 चा MotoGP एडिशन लॉन्च, स्वस्त E20 पेट्रोलवरही धावणार
Yamaha Aerox 155 Moto GP Edition
Yamaha Aerox 155 Moto GP EditionSaam Tv
Published On

Yamaha Aerox 155 MotoGP Edition:

आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने Aerox 155 चा MotoGP एडिशन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. ही स्पेशल एडिशन स्कूटर मर्यादित संख्येत विकली जाईल. या एडिशनसह Aerox 155 मेटॅलिक ब्लॅक, रेसिंग ब्लू, ग्रे वर्मिलियन आणि सिल्व्हर या 4 रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

या स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.48 लाख रुपये आहे. आता या स्कूटरला क्लास डी हेडलॅम्प मिळेल. एवढेच नाही तर रायडरच्या सुरक्षेसाठी यात ट्रॅक्शन कंट्रोलही दिला जाणार आहे. या स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Yamaha Aerox 155 Moto GP Edition
Harley Davidson X440 ची सर्वात स्वस्त बाईक आली, कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Yamaha Aerox 155 च्या MotoGP एडिशनची डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखीच आहे. मोटो जीपी ब्रँडिंगसह स्कूटरला ऑल-ब्लॅक कलर स्कीम मिळते. याच्या स्पोर्टी फ्रंट अॅप्रॉनमध्ये नवीन ग्राफिक्स आहेत, जे मोटो जीपी रेस मॉडेल्सवर आढळतात. (Latest Marathi News)

कंपनीने ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑल-एलईडी सेटअप आणि बॉडी-रंगीत 14-इंच अलॉय व्हीलसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यात दिले आहेत. यात ड्युअल चॅनल ABS सोबत दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देखील मिळतात.

Yamaha Aerox 155 Moto GP Edition
New Electric Scooter: 120km ची जबरदस्त रेंज, किंमतही 1 लाखपेक्षा कमी; लॉन्च झाली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

Yamaha Aerox 155 MotoGP Edition मध्ये उपलब्ध असलेल्या इंजिनबद्दल सांगायचे तर, सध्याच्या मॉडेलप्रमाणे यात 155cc, ब्लू कोर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. जे व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्ट्युएशनने (VVA) सुसज्ज आहे. हे CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.

याचे इंजिन 8,000rpm वर 14.79bhp पॉवर आणि 6,500rpm वर 13.9Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन E20 इंधनालाही सपोर्ट करेल. ज्यामध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. ही स्कूटर ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक सिस्टमसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com