Yamaha FZ S Fi Saam tv
बिझनेस

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

Yamaha FZ S Fi New Bike: यामाहाच्या बाईक स्टायलिश लूक आणि पॉवरफुल इंजिनसाठी ओळखल्या जातात. अशातच आज कंपनीने आपली हाय मायलेज बाईक Yamaha FZ S Fi दोन नवीन रंग पर्यायात लॉन्च केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Yamaha FZ S Fi New Bike:

यामाहाच्या बाईक स्टायलिश लूक आणि पॉवरफुल इंजिनसाठी ओळखल्या जातात. अशातच आज कंपनीने आपली हाय मायलेज बाईक Yamaha FZ S Fi दोन नवीन रंग पर्यायात लॉन्च केली आहे. आता ही बाईक नवीन Ice Fluo-Vermillion आणि Cyber ​​Green रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल.

सध्या ही बाईक डार्क नाइट, मॅट ग्रे आणि मॅट रेड रंग बाजारात उपलब्ध आहेत. ही बाईक 1.22 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत कंपनी ऑफर करत आहे. यामाहा बाईकमध्ये सॉलिड 149 सीसी इंजिन देण्यात आले अहे.

13 लीटरची मोठी इंधन टाकी आणि स्टायलिश अलॉय व्हील्स

Yamaha FZ S Fi 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते. यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक रस्त्यावर 45 kmpl पर्यंत मायलेज देईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात 13 लिटरची मोठी इंधन टाकी आहे. रायडरच्या सुरक्षेसाठी, यात पुढील आणि मागील टायरवर डिस्क ब्रेक आहेत. या बाईकमध्ये स्टायलिश अलॉय व्हील देण्यात आले अहेत.

फीचर्स

यामाहा बाईकमध्ये 2 प्रकार उपलब्ध आहेत. रस्त्यावर ही बाईक 115 kmph चा टॉप स्पीड देते. बाईकची सीटची उंची 790 मिमी आहे. ही बाईक 7250 rpm वर 12.2 bhp ची पॉवर जनरेट करते. बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधाही ग्राहकांना मिळेल.

हे 5500 rpm वर 13.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स देण्यात आलेत अहेत. Yamaha FZ S FI चे वजन 135 किलो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT