Redmi Note 13 Saam Tv
बिझनेस

Xiaomi ची Redmi Note 13 सीरीज लाँच; 200MP कॅमेरासह दिवसभर टिकेल इतकी तगडी बॅटरी

Redmi Note 13 Series: स्मार्टफोनमध्ये शाओमी ही कंपनी नावाजलेली आहे. कंपनी नेहमीच युजर्ससाठी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकतेच Redmi Note 13 5G, Redmi Note 13 Pro 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G फोन लाँच केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Redmi Note 13 Series Price Features:

स्मार्टफोनमध्ये शाओमी ही कंपनी नावाजलेली आहे. कंपनी नेहमीच युजर्ससाठी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकतेच Redmi Note 13 5G, Redmi Note 13 Pro 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G फोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन नवीन फिचर्ससह लाँच होणार आहे.

कंपनीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. हे स्मार्टफोन 16MP सेल्फी कॅमेरा सह येतात. कंपनीने या सीरीजच्या प्रो व्हेरियंटमध्ये 200MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. (Latest News)

किंमत

Redmi Note 13 5G चा 64 Gb RAM+, 128 GB स्टोरेज व्हेरियंट स्मार्टफोन 17,999 रुपयांना येतो. तर सीरीजच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. हा फोन आर्टिक व्हाइट, प्रिझम गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये येतो.

Redmi Note 13 Pro 5G तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आणि 27,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तुम्ही ते पांढऱ्या, जांभळ्या आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता.

Redmi Note 13 Pro+ 5G च्या टॉप मॉडेलची म्हणजेच 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. तर त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,999 रुपये आहे आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे.

Redmi Note 13 फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच AMOLED स्क्रिन देण्यात आली आहे.ही स्क्रिन 120Hz रिफ्रेश रे, 1000Nits ब्राइटनेस, गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येते.यात 108MP + 2MP रीअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनची बॅटरी 500mAh आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Annual Pass: आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस

Diabetes in India: देशात वाढतोय मधुमेहाचा धोका; 10 पैकी 4 जण अनभिज्ञपणे जगतायत या आजारासोबत

Independence Day 2025 Live Update: मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला- पीएम मोदी

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा; पाहा VIDEO

PM Narendra Modi: न्यूक्लियरच्या धमक्यांना भीक घालणार नाही, सडेतोड उत्तर देऊ; पीएम मोदींचा पाकिस्तानला इशारा

SCROLL FOR NEXT