Manasvi Choudhary
फोनचं स्टोरेज फुल झालयं, काहीच डाऊनलोड होत नाही असे शब्द तुमच्याही कानी पडलेच असतील.
अनेकदा फोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळे कोणतेच फोल्डर देखील ओपन होत नाही. अॅप्स डाऊनलोड करता येत नाही
यामुळे फोन स्टोरेज कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
फोनमधील स्पेस वाढवण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन कॅशे क्लिअर करा.
फोनमध्ये अधिक डेटा असल्यास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करा.
इमेलमध्ये जी अॅटच फाईल येते ती डाऊनलोड केल्याने फोनचा स्टोरेज भरतो यामुळे जर अॅटच फाईल उपयुक्त नसेल तर ती डिलीट करा.
अॅप्स डिलीट केल्यानंतरही जर स्टोरेज कमी असेल तर फोनच्या गॅलेरीत नको असलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट करा.