Railway Refund Rules Policy: ट्रेन उशीरा आली..घाबरून जाऊ नका, मिळेल पूर्ण परतावा, कसं ते जाणून घ्या

Railway Refund Rules Policy News: कन्फर्म, आरएसी किंवा वेटिंगलिस्टवर असलेल्या तिकीटधारकांची ट्रेन स्थानकावर यायला ३ तासांपेक्षा उशीर झाला आणि या प्रवाशांनी उशिरामुळे प्रवास न करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना तिकीटाचा परतावा मिळू शकणार आहे.
Railway Refund Rules Policy
Railway Refund Rules PolicySaam Digital
Published On

Railway Refund Rules Policy

सहसा लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. भारतात दररोज लाखो प्रवाशी रेल्वेन प्रवास करतात. रेल्वे खात्यावकडून गाड्या वेळेवर सोडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र काही ना काही कारणामुळे ट्रेन उशिराने स्थानकावर येतात. काही वेळा ७-८ तास इशिराने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. काहीवेळा प्रवाशी उशिराचा प्रवासच टाळतात. मात्र काढलेल्या तिकीटाचं काय? त्याचे पैसे तर वाया जाणारचं. मात्र आता घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्हाला माहिती आहे का की तुमची ट्रेन जर यायला उशीर झाला तर रेल्वेच्या रिफंड रुल्स पॉलिसीअंतर्गत तिकीटचा पूर्ण परतावा मिळू शकतो?

कन्फर्म, आरएसी किंवा वेटिंगलिस्टवर असलेल्या तिकीटधारकांची ट्रेन स्थानकावर यायला ३ तासांपेक्षा उशीर झाला आणि या प्रवाशांनी उशिरामुळे प्रवास न करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना तिकीटाचा परतावा मिळू शकणार आहे. प्रवाशांकडे ई- तिकीट असले तर, पूर्ण परतावा मिळवण्यासाठी ट्रेन सुटण्यापूर्वी प्रवाशांना ऑनलाईन टीडीआर भरावा लागेल. तसेच तिकीट आरक्षण काउंटरवरून खरेदी केलं असल्यास पूर्ण परतावा मिळवण्यासाठी तिकीट रद्द करावं लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Railway Refund Rules Policy
Amazon Flipkart Offers: 50MP कॅमेरा, 5000 mAh ची दमदार बॅटरी; 7000 पेक्षा कमी किंमतीत Redmi चा हा फोन खरेदी करण्याची संधी

ई-तिकिटासाठी सहसा ३ ते ७ दिवसात तिकीटाचे पैसे रिफंड केले जातात. तिकीटाची ही रक्कम तिकीट बुकिंगच्यावेळी पेमेंट करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यावर जमा केली जाते. मात्र काही कारणास्तव ट्रेन सुटली आणि तिकीट रद्द केलं तर असे प्रवासी पैसे रिफंड करण्यास पात्र असणार नाहीत.

Railway Refund Rules Policy
Government Scheme For Girls: मुलींसाठी या सरकारी योजना ठरतील फायदेशीर; शिक्षणापासून लग्नापर्यंत मिळणार लाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com