SUV Under 10 Lakhs Saam Tv
बिझनेस

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

SUV Under 10 Lakhs: आम्ही तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतच्या काही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्सबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

साम टिव्ही ब्युरो

SUV Under 10 Lakhs:

एसयूव्ही कारची बाजारात एक वेगळीच क्रेझ आहे. अलीकडे लोकांना कॉम्पॅक्ट SUV कार अधिक पसंत येत आहेत. या कार्सला हाय एंड लूक आहे, मस्क्युलर फ्रंट लूकसोबतच या कार्स मध्ये सीएनजी इंजिनही देण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट यासारखे जबरदस्त फीचर्सही या कार्समध्ये पाहायला मिळतात.

स्टॅबिलिटी कंट्रोल फीचर्सने जेव्हा ड्रायव्हर अचानक कार वेगात वळवतो तेव्हा इलेक्ट्रॉनिक तेव्हा सेन्सरद्वारे चारही चाकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याशिवाय हिल होल्ड असिस्टमध्ये उंचीवर चढत असताना कार मागे सरकण्याची भीती नाही, यामुळे चालकाला चारही चाकांवर अतिरिक्त नियंत्रण मिळते. अशातच आम्ही तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतच्या काही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्सबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO ही पाच सीटर कॉम्पॅक्ट SUV कार आहे. ही कार 9.03 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी यात सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. ही कार 21.2 kmpl पर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

Toyota Urban Cruiser Taisor

Toyota Urban Cruiser Taisor मध्ये 998 cc ते 1197 cc पर्यंतचे इंजिन आहेत. यामध्ये 12 व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ही कार 9.32 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत.

Tata Punch

Tata Punch मध्ये पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि CNG इंजिन पर्याय उपलब्ध आहेत यात पॉवरफुल 1199 cc इंजिन आहे. जे पेट्रोलवर 18.8 kmpl आणि CNG वर 26.99 km/kg मायलेज देते. या पाच सीटर कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT