Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Porsche India: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Porsche India ने 2024 Panamera भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. याची किंमत कंपनीने 1.69 कोटी (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.
Porsche Panamera
Porsche PanameraSaam Tv

Porsche Panamera:

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Porsche India ने 2024 Panamera भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. याची किंमत कंपनीने 1.69 कोटी (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. कंपनी आता भारतात नवीन Panamera ची डिलिव्हरी देखील सुरू करणार आहे. या लक्झरी सेडानमध्ये कॉस्मेटिक अपग्रेडसह फीचर्सही जोडण्यात आले आहेत. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Porsche ची नविन कार दिसायला अत्यंत आकर्षक आहे. ही एलईडी मॅट्रिक्स लाइटने सुसज्ज आहे. याची बाहेरी डिझाइन बऱ्यापैकी जुन्या मॉडेल सारखीच आहे.

Porsche Panamera
Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

10.9-इंच पॅसेंजर डिस्प्ले

या कारच्या केबिनच्या आत डॅशबोर्ड नवीन स्टिअरिंग व्हीलच्या उजवीकडे हलवण्यात आला आहे. हे फीचर इलेक्ट्रिक Taycan पासून घेतले आहे. यात 10.9-इंच पॅसेंजर डिस्प्ले देखील ग्राहकांना मिळणार आहे.

यामध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेडानला 8-वे पॉवर ॲडजस्टेबल सीट, 6 एअरबॅग्ज, पोर्श कम्युनिकेशन मॅनेजमेंट (पीसीएम) नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हॉईस कमांड आणि असे अनेक फीचर्स यामध्ये ग्राहकांना पाहायला मिळतील.

Porsche Panamera
Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Porsche Panamera मध्ये 2.9-लिटर ट्विन-टर्बो V6 इंजिन देण्यात आले आहे. जे 343bhp पॉवर आणि 500Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही पॉवर 8-स्पीड पीडीके ऑटोमॅटिक ट्रान्समिशनद्वारे मागील व्हीलला पुरवते. कारमध्ये ड्युअल डायमेंशनल ॲडॉप्टिव्ह रियर स्पॉयलर देखील आहे. ही कार फक्त 4.8 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com