how to write cheque amount in words / canva SAAM TV
बिझनेस

How to write amount in Cheque : चेकवर स्वाक्षरीवेळी रकमेच्या शेवटी Only लिहावं, अन्यथा...जाणून घ्या कारण

Cheque : चेकवर रक्कम टाकल्यानंतर त्याच्या शेवटी ONLY का लिहितात? का आहे महत्वाचे?

Saam Tv

Cheque deposit :

बहुतांश लोक ऑनलाइन बँकिंगद्वारे पेमेंट करतात. मात्र अनेकदा ऑनलाइन पेमेंटचा अॅक्सेस नसल्याने चेकद्वारे (धनादेश) पेमेंटचा पर्याय निवडला जातो. मात्र, चेकद्वारे पेमेंट करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. चेकवर रक्कम नमूद केल्यानंतर शेवटी ONLY (फक्त) लिहितात. हा शब्द इतका महत्वाचा का आहे? त्याची का आवश्यकता आहे, हे जाणून घ्यायला हवे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चेकवर रक्कम नमूद केल्यानंतर Only लिहिलं नाही तर तो बाउन्स होणार का, असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांचा तर समजच झाला आहे. पण तसं नाही. चेकवर रक्कम किती हे नमूद केल्यानंतर शेवटी ओन्ली लिहिल्याने फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे चेकवर रकमेनंतर Only लिहिणे महत्वाचे आहे.

नुकसान होऊ शकतं?

चेकवर रकमेच्या पुढे Only न लिहिल्यास, ज्या व्यक्तीला चेक दिला आहे ती व्यक्ती रकमेसमोर एक शून्य किंवा दोन शून्य वाढवून तुमच्या खात्यातून अधिक पैसे वळते करून घेऊ शकते. तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे रकमेसमोर Only लिहिणे महत्वाचे आहे. (Banking)

चेकवर दोनच रेषा का?

चेक भरताना त्याच्या वरच्या बाजूला कोपऱ्यावर दोन रेषा काढणे महत्वाचे आहे. 'अकाउंट पेयी' असा त्याचा अर्थ होतो. चेकवर ज्याचे नाव नमूद आहे, त्याच व्यक्तीला ती रक्कम मिळेल, असा त्याचा अर्थ होतो. काही जण दोन रेषांच्या मध्यभागी A/C Payee लिहितात. त्यामुळे धनादेशाद्वारे व्यवहार सुरक्षित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT