Wagh Bakri Tea Owner Dies: 'वाघ-बकरी चहा'च्या मालकाचे निधन; अवघ्या ४९ व्या वर्षी उद्योजकानं घेतला जगाचा निरोप

Parag Desai Passed Away: डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र हे सर्व प्रयत्न फेल ठरले.
Wagh Bakri Tea Owner Dies
Wagh Bakri Tea Owner DiesSaam TV

Wagh Bakri Tea:

वाघ-बकरी चहा कंपनीचे मालक आणि संचालक पगार देसाई यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. फार कमी वयात मोठ्या उद्योजकाच्या निधनामुळे सर्वच स्थरांतून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wagh Bakri Tea Owner Dies
Pune Crime News : पुणेकर आजोबांना कॉल गर्लची भेट महागात पडली, ३ महिन्यात ३० लाखांची फसवणूक; नेमकं काय झालं?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्यापासून पगार देसाई रुग्णालयात उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकसाठी ते घराबाहेर पडले. त्यावेळी वॉक करताना अचानक ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारा दरम्यान त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र हे सर्व प्रयत्न फेल ठरले आणि उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वाघ बकरी चहा चहाप्रेमींसाठी फार प्रसिद्ध आहे. साल १८९२ मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली होती. जळपास ५० दशलक्ष किलो या चाहापावडरचे वितरण होत आहे. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांत वाघ बकरीला विशेष पसंती आहे.

Wagh Bakri Tea Owner Dies
Beed Crime: परळीत कायद्याचा धाक संपला? धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवले; परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com