Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

Beed Crime: परळीत कायद्याचा धाक संपला? धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवले; परिसरात खळबळ

Beed Crime News: धारदार शस्त्राने वार करत 36 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Published on

Beed Parli Crime News:

बीड जिल्ह्यात खून, मारामाऱ्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. बीडच्या परळीमध्ये आणखी एक निर्घृण हत्येची घटना घडली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत कायद्याचा धाक संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परळी शहरात वनविभागाच्या कार्यालयासमोर धारदार शस्त्राने वार करत 36 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महादेव मुंडे असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मृताच्या शरिरावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तहसील कार्यालय आणि वनविभागाचे कार्यालय असलेल्या सततच्या वर्दळीच्या भागात हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Crime News
Yewla Crime News : येवला परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा; २५ लाखांचा मुद्देमाल लांबविला

पोलीस या हत्याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या परळी शहरात गुन्हेगारी, खून, मारामाऱ्या, लुटीचे प्रकार वाढल्याने पोलीस प्रशासन नेमके करतेय काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोल्हापुरमध्ये वृद्ध महिलेची हत्या....

कोल्हापूर शहरातही एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्येची घटना समोर आली आहे. लक्ष्मी विलास क्षीरसागर असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्या जवाहर नगर परिसरातील सरनाईक वसाहत इथे राहत होत्या.

शनिवारी (२१, ऑक्टोंबर) रात्री आठ वाजता त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी राजारामपूरी पोलीस चौकीत तक्रारही दाखल केली होती. रविवारी (२२, ऑक्टोंबर) त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Beed Crime News
Pune Accident: पुणेकरांना पुन्हा 'संतोष माने'ची आठवण, मद्यधुंद PMPML चालकाने १०- १५ वाहनांना उडवले, थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com