Bugdet 2025 Saam Tv
बिझनेस

Bugdet 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प कधी सादर करणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की नाही?

Bugdet 2025 Date: अर्थमंत्री निर्मला सितारामन या वर्षात अर्थसंकल्प सादर करणार आहे. १ फेब्रुवारी शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार की नाही? याबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

Siddhi Hande

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन २०२५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करणार आहे. १ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्मला सितारामन केंद्रिय बजट जाहीर करणार आहे. १ फेब्रुवारी २०२५ म्हणजेच शनिवारी बजेट जाहीर केले जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हे पहिले बजेट असणार आहे.

निर्मला सितारामन सलग आठव्यांदा बजेट जाहीर करणार आहेत. त्यानी याआधी एक पूर्ण टर्म ५ वर्षे आणि त्याआधी दोन वर्षे बजेट जाहीर केले होते. (Budget 2025)

१ फेब्रुवारी २०२५ रोजी बजेट जाहीर होणार आहे. त्यामुळे शेअर मार्केट खुलं राहणार आहे. शनिवारी बजेट जाहीर होणार आहे त्यामुळे शेअर मार्केट खुलं राहणार आहे.शेअर मार्केट आपल्या रेग्युलर वेळेनुसार काम करणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अर्थसंकल्पाबाबतचे भाषण दूरदर्शन आणि संसद टीवीद्वारे प्रसारित केले जाणार आहे. याचसोबत त्यांच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरदेखील लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.(Budget 2025 Date)

बजेट जाहीर झाल्यानंतर यूनियन बजेट या मोबाईल अॅपवर किंवा वेब पोर्टल www.indianbudget.gov.in तुम्हाला सर्व कागदपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती या अॅपवर मिळणार आहे. तुम्ही तुमच्या फोनवर हे सर्व कागदपत्रे अपलोड करु शकतात.

इन्कम टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता

२०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात इन्कम टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्सपासून सूट मिळू शकते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या बजेटमध्ये टॅक्समध्ये कपार करणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, किती आणि कोणत्या श्रेणीसाठी ही कपात केली जाणार, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT