
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक कामांसाठी आधार कार्डची गरज भासते. शाळेपासून ते अगदी कोणत्याही सरकारी कामांसाठी आधार कार्ड हे गरजेचे असते. आधार कार्डवर प्रत्येकाचा युनिका १२ अंकी नंबर असतो. हा नंबर खूप महत्त्वाचा असतो. परंतु अनेकदा आधार कार्ड आपण विसरतो किंवा ते हरवते. तर अशा परिस्थितीत काय करावे जाणून घ्या.
आधार कार्ड हरवल्यावर अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमच्याजवळ आधार असणे गरजेचे आहे. तुम्ही डिजिटल पद्धतीनेदेखील आधार कार्ड मिळवू शकतात. आधार कार्डची पीडीएफ किंवा प्रिंट काढू शकतात. यामुळे तुमचे आधार कर्ड डिजिटली तुमच्याकडे सेव्ह असेल.
आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं (How To Download Aadhaar Online)
सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
त्यानंतर माय आधार वर जा. त्यानंतर डाउनलोड आधारवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला १२ अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल. त्यानंतर ओटीपी टाकून वेरिफाय करुन डाउनलोडवर वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आधार कार्डची पीडीएफ मिळणार आहे. त्यासाठी पासवर्डदेखील असेल.
ऑफलाइन पद्धतीने आधार कसं मिळवायचं? (How To Get Aadhaar Offline)
सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जायचे आहे.
त्यानंतर आधार सेक्शनमध्ये जाऊन ऑर्डर आधार रिप्रिंटवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाका.
यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. यानंतर टर्म्स अँड कंडीशनवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्ड प्रिंट होऊन १५ दिवसांत तुमच्या घरी येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.