Whatsapp Feature SaamTv
बिझनेस

Whatsapp Feature : खुशखबर! आता इंटरनेटशिवायही Whatsapp वापरता येणार; मोठमोठ्या फाइल्स एका झटक्यात सेंड होणार, जाणून घ्या...

Whatsapp Upcoming Sharing Feature: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन फीचर लाँच करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आता इंटरनेटशिवाय तुम्ही फाइल्स शेअर करु शकणार आहे. मेटा कंपनी सध्या या फीचरवर काम करत आहे.

Siddhi Hande

जगभरात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे आपण कोणतीही माहिती सहजपणे मिळवू शकतो. व्हॉट्सअॅपचा वापर करताना इंटरनेट खूप महत्त्वाचे असते. इंटरनेटशिवाय आपण व्हॉट्सअॅपद्वारे कोणताही मेसेज ट्रान्सफर करु शकत नाही. परंतु आता तुम्ही कोणताही फाइल इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करु शकणार आहेत. यासाठी व्हॉट्सअॅप लवकरच एक फीचर लाँच करणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, मेटा कंपनी व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या मित्रांना कोणताही चित्रपट किंवा हेवी फाइल पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. हे फिचर आयफोन एअरड्रॉप फाइल शेअरिंग फिचरप्रमाणे काम करेल.

मिडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप नवीन फाइल शेअरिंग फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर इंटरनेटशिवाय फाइल पाठवण्यासाठी मदत करेन. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमुळे तुम्हाला फोटो, व्हिडिओ, फाइल शेअर करणे सोपे होणार आहे. WhatsApp च्या या फीचरमध्ये क्यूआर कोडचा वापर केला जाईल. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करुन फाइल ट्रान्सफर करता येणार आहे.

अनेकदा मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे इंटरनेटशिवाय फाइल ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन असेल. ज्यामुळे युजर्सच्या गोपनियतेचे पाळन केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

SCROLL FOR NEXT