WhatsApp वापरणाऱ्या युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. 8 सप्टेंबरपासून काही जुन्या स्मार्टफोन्सवर WhatsApp काम करणे बंद करणार आहे. Meta ने Android आणि iPhone युजर्ससाठी ऑपरेटिंग सिस्टमच्या किमान गरजांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये WhatsApp वापरता येणार नाही.
WhatsApp ने Android डिव्हाइससाठी आपली किमान ऑपरेटिंग सिस्टम आवश्यकता वाढवली आहे. कंपनीने WhatsApp Help Centerवर दिलेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबरपासून Android 5.0 आणि Android 5.1 वर WhatsApp सपोर्ट मिळणार नाही. म्हणजेच, ज्या स्मार्टफोनमध्ये Android 6.0 किंवा त्यापुढील व्हर्जन अपडेट करता येत नाही, अशा डिव्हाइसवर WhatsApp वापरता येणार नाही.
WhatsAppच्या अपडेटनुसार, 8 सप्टेंबरपासून Android 6.0 किंवा त्यापुढील व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवरच WhatsApp काम करेल. iPhone युजर्ससाठी हा बदल लगेच लागू होणार नाही. WhatsAppने iOS साठी नवीन किमान आवश्यकता 30 नोव्हेंबर 2026 पासून लागू करण्याचे स्पष्ट केले आहे. सध्या iOS 15 वर WhatsApp वापरणाऱ्या iPhone युजर्सना लगेच चिंता करण्याची गरज नाही. मात्र 30 नोव्हेंबर 2026 पासून WhatsApp चालवण्यासाठी iOS 15.5 किंवा त्यापुढील व्हर्जन आवश्यक असेल. त्यामुळे iOS 15.5 पेक्षा जुन्या व्हर्जनवर असलेल्या iPhoneमध्ये 30 नोव्हेंबरनंतर WhatsApp काम करणे बंद करू शकते.
WhatsAppने यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिव्हाइस आणि सॉफ्टवेअरमध्ये सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे वेळोवेळी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट द्यायचा, याचा आढावा घेतला जातो. दरवर्षी कंपनी कोणते डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर सर्वात जुने आहेत आणि त्यांचा वापर करणाऱ्या युजर्सची संख्या किती आहे, याचा विचार करते. जुन्या डिव्हाइसमध्ये नवीन सिक्युरिटी अपडेट उपलब्ध नसण्याची शक्यता असते. तसेच WhatsAppच्या नवीन फीचर्ससाठी आवश्यक असलेली काही फंक्शन्सही या डिव्हाइसमध्ये उपलब्ध नसतात.
त्यामुळे अशा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या डिव्हाइसचा WhatsApp सपोर्ट बंद केला जातो.
तुमचा स्मार्टफोन WhatsAppच्या नवीन किमान आवश्यकतांमध्ये बसत नसेल, तर कंपनीकडून तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. सपोर्ट बंद करण्यापूर्वी WhatsApp युजर्सना याबाबत सूचना देईल आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्याची आठवण करून देईल. जर तुमचा फोन नवीन ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करत नसेल, तर WhatsApp वापरणे सुरू ठेवण्यासाठी नवीन किंवा अपग्रेडेड ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणारा स्मार्टफोन घ्यावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.