WhatsApp New Feature  Saam Tv
बिझनेस

Whatsapp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर, स्पॅम कॉल आता लॉक स्क्रिनवरुन होणार ब्लॉक; जाणून घ्या सविस्तर

Whatsapp Feature: जगभरातील लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फिचरमुळे आता स्पॅम कॉल्स लॉक स्क्रिनवरुन ब्लॉक करता येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Whatsapp New Feature To Block Spam Calls Direct From Lock Screen:

जगभरात लाखो लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी नेहमी नवनवीन फीचर लाँच करत असते. व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम कॉलसाठी एक फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे स्पॅम कॉल लॉक स्क्रिनवरुनच ब्लॉक करु शकता येणार आहे.

या नवीन फीचरमुळे युजर लॉक स्क्रिनवर स्पॅम कॉल ब्लॉक करु शकता. त्यामुळेच युजरला अॅपवर जाण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप युजर्संना स्पॅम मेसेज आणि कॉल्समुळे त्रास होतो. त्यामुळे युजर्संना या कॉल्सचा त्रास होतो. त्यामुळेच हे फीचर लाँच केले आहे. (Latest News)

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फीचर स्पॅम कॉल आणि मेसेज ओळखण्याची आणि ब्लॉक करण्याची सुविधा देते. ज्यात लॉक स्क्रिनवर कॉल्स ब्लॉक करता येणार आहे. यासाठी जेव्हा स्पॅम कॉल्स किंवा मेसेज येतो तेव्हा युजर्संना त्या मेसेजवर काहीवेळ प्रेस करायचे. त्यानंतक त्यावर वेगवेगळे पर्याय दिसतात. ज्यात मेसेज पाठवणाऱ्याला ब्लॉक करणे हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर मेसेजिंग अॅपवर दूसरा प्रॉम्प्ट दिसते. ज्यात तुम्ही ब्लॉक केलेल्या सेंडरला रिपोर्टदेखील करु शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी नंबरवरुन कॉल किंवा मेसेज आल्यास त्याला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जोडणे, ब्लॉक करणे किंवा तक्रार करणे असे पर्याय दाखवले जातात. जर तुम्हाला कोणत्या कॉन्टॅक्टला ब्लॉक करायचे असेल तर त्यासाठी Settings > Privacy > Blocked contacts > Add मध्ये जा. त्यानंतर ज्या नंबरला ब्लॉक करायचे आहे तो नंबर सर्ज करा आणि सिलेक्ट करा. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमुळे स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यास मदत होणार आहे.

या फीचरनंतर व्हॉट्सअॅप लवकरच आणखी एक फीचर लाँच करणार आहे. त्यात तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवरदेखील मेसेज पाठवू शकणार आहात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला इन्स्टाग्राद्वारे संदेश दिला तर तो तुमच्या व्हॉट्सअॅपवरदेखील प्राप्त केला जाऊ शकतो. यासाठी व्हॉट्सअॅप लवकरच थर्ड पार्टी चॅट्सचा ऑप्शन देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT