Petrol Diesel Rate (12th Feb 2024)
Petrol Diesel Rate (12th Feb 2024)Saam Tv

Petrol Diesel Rate (12th Feb 2024): कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

Petrol Diesel Price Today 10th February 2024 : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. अशातच महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.
Published on

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता WTI क्रूड प्रति बॅरल $ 76.38 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81.76 वर व्यापार करत आहे.

देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Price) जाहीर केले आहेत. अशातच महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल २५ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी स्वस्त झालं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल (Petrol) २१ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी स्वस्त झालं आहे. तसेच ओडिशा, तेलगंणा, हिमाचल प्रदेशमध्येही तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तर देशातील काही राज्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

Petrol Diesel Rate (12th Feb 2024)
Valentine Day Couple Spots : पार्टनरसोबतचा 'व्हॅलेंटाइन डे' होईल रोमँटिक! भन्नाट स्थळांना भेट द्या

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२. रुपये आणि डिझेलचा दर ९०.०८ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

Petrol Diesel Rate (12th Feb 2024)
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : व्हॅलेंटाइन स्पेशल! या राशींच्या जोडप्यांसाठी हा आठवडा अधिक महत्त्वाचा, नात्यात येईल दूरावा

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.१७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.६८ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५४ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.२८ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.८२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०९.०३ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.७१ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com