WhatsApp  google
बिझनेस

WhatsApp Update: व्हॉट्सॲपचे धासू फीचर, आता एकाच फोनमध्ये उघडता येणार अनेक अकांऊट

WhatsApp Account: व्हॉट्सॲप दरवर्षी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स सादर करत असते. यावर्षीही काही खास आणि रोमांचक फीचर्स येण्याची शक्यता आहे. नुकतेच स्टेटस अपडेटसाठी व्हॉट्सॲपने काही नवीन फीचर्स जारी केली आहेत.

Dhanshri Shintre

व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी दरवर्षी नवीन फीचर्स आणत असतात आणि यावर्षीही तशाच काही रोमांचक फीचर्सची तयारी सुरू आहे. अलीकडेच, व्हॉट्सॲपने स्टेटस अपडेटसाठी काही नवीन फीचर्स जारी केले होते. आता कंपनी "मल्टी-अकांऊट" नावाचे नवे फीचर्स सादर करत आहे. Android 2.23.17.8 साठी WhatsApp Beta चाचणीदरम्यान हे फीचर काही बीटा युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फीचरद्वारे युजर्सला एकाच ॲपमध्ये वैयक्तिक, व्यावसायिक आणि इतर अकांऊट ऑपरेट करता येणार आहेत. हे फीचर युजर्सचे जीवन सुलभ करण्यासाठी डिझाइन केले आहे, कारण त्यांना अनेक अकांऊट एका फोनवरच उघडता येतील.

व्हॉट्सॲपचे अकांऊट व्यवस्थापनाचे फीचर्स वापरकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आता कंपनी हे फीचर iOS वापरकर्त्यांसाठीही सादर करण्याच्या तयारीत आहे. WABetaInfo ने iOS 25.2.10.70 अपडेटसाठी WhatsApp बीटामध्ये एकाच ॲपमध्ये अनेक अकांऊट जोडणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे फीचर शोधले आहे. हे नवीन फीचर युजर्सना वैयक्तिक आणि व्यावसायिक अकांऊट एकाच डिव्हाईसवर सहजपणे ऑपरेट करण्याची सुविधा देईल, ज्यामुळे WhatsApp वापरण्याचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.

WABetaInfo ने या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये युजर्सना एका ॲपमध्ये अनेक अकांऊट लॉग इन करण्याची सुविधा दिसते. हे फीचर अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल जे विविध फोन नंबरसह एकापेक्षा जास्त व्हॉट्सॲप अकांऊट वापरतात. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक खाती एका ठिकाणी सहजपणे व्यवस्थापित करता येतील, ज्यामुळे फोन स्विच करण्याची गरज कमी होईल आणि अनुभव अधिक सुलभ बनेल.

व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना ॲपमध्ये नवीन अकांऊट जोडण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील. पहिला पर्याय वापरकर्त्यांना डिव्हाइसवर प्राथमिक अकांऊट सेट करण्यास सक्षम करेल, तर दुसऱ्या पर्यायाद्वारे QR कोड स्कॅन करून अकांऊट लिंक करता येईल. यामुळे सर्व संभाषण एकाच ॲपमध्ये सेव्ह करता येतील. विशेष म्हणजे प्रत्येक खाते स्वतंत्रपणे कार्य करेल, ज्यामुळे चॅट्स, बॅकअप आणि सेटिंग्ज वेगळ्या असतील. हे फीचर अद्याप विकासाच्या टप्प्यात असून, कंपनी लवकरच जागतिक स्तरावर वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT