TDS refund process saam tv
बिझनेस

What is TDS: टीडीएस म्हणजे काय, रिफंड कसा मिळवाल? कसा तपासाल TDS, जाणून घ्या सर्व माहिती एक क्लिकवर

TDS Refund Process: जर तुमच्या पगारातून टीडीएस कापला असेल तर तुम्ही काही गोष्टींचा विचार करावा. TDS आणि त्याच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबी आजच्या या आर्टिकलमधून आपण समजून घेऊ.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हाला कंपनीकडून येणारा पगार अनेक भागात विभागलेला आहे. यामधील दर महिन्याला पगार म्हणून काही भाग मिळतो. त्यामुळे काही भाग कापला जातो. TDS हा देखील यापैकी एक भाग आहे. जर तुमच्या पगारातून टीडीएस कापला असेल तर तुम्ही काही गोष्टींचा विचार करावा. TDS आणि त्याच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबी आजच्या या आर्टिकलमधून आपण समजून घेऊ.

टीडीएस म्हणजे नेमकं काय?

TDS म्हणजे Tax Deducted at Source. हा कर आहे जो तुचम्या उत्पन्नातून कापला जातो. एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा स्रोत कोणताही असो, त्यातून कापलेल्या कराला TDS म्हणतात. हा अप्रत्यक्ष कर आहे.

टीडीएस कधी कापला जात नाही?

तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPF) 5 वर्षापूर्वी काढल्यास तुमचा TDS कापला जातो. मात्र जर तुमची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर TDS कापला जाणार नाही. ही फार महत्त्वाची बाब असून लक्षात ठेवा.

TDS रिफंड

जर तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतातून जास्तीचा कर कापला गेला असेल तर तो परत मिळवण्याच्या प्रक्रियेला रिफंड म्हणतात. आयकर विभागाने टीडीएस परतावा देण्यास उशीर केल्यास, त्याला तुम्हाला वार्षिक ६ टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

TDS रिफंडचा फायदा

याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की जर तुम्ही TDS द्वारे जास्तीचा कर भरला असेल तर तुम्ही परतावा क्लेम करून ते पैसे परत मिळवू शकता. याव्यतिरिक्त, परताव्याचा दावा केल्याने तुमचे वार्षिक कर दायित्व कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमचे आणखी पैसे वाचतील.

पॅन कार्डद्वारे टीडीएस स्थिती कशी तपासायची?

  • पॅन कार्ड वापरून टीडीएस स्थिती तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

  • www.tdscpc.gov.in/app/tapn/tdstcscredit.xhtml वर जा .

  • की-इन कोड.

  • 'प्रोसीड' वर क्लिक करा.

  • PAN आणि TAN प्रविष्ट करा.

  • आर्थिक वर्ष तसेच तिमाही आणि परतावा यापैकी पर्याय निवडा.

  • 'गो' वर क्लिक करा.

  • संपूर्ण तपशील संबंधित स्क्रीनवर दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

Chanakya Niti : आयुष्यात एकदातरी प्रेमात पडलेल्यांनी नक्की वाचा 'या' सिक्रेट टिप्स

Maharashtra Live News Update : उपसभापती हरिवंश सिंह यांनी भूषवलं राज्यसभेचं सभापतिपद

Beed : मुलीचे अपहरण; वीस दिवसांपासून तपास लागेना, पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचे नातेवाईकांचा आरोप

Crime: विधवेला सासरच्यांनीच दीड लाखांत विकलं; नोकरीची भूलथाप देत मध्यप्रदेशात नेलं अन्..

SCROLL FOR NEXT