Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे? महिलांना दरमहा किती रुपये मिळणार, जाणून घ्या; VIDEO

A Maharashtra Goverment Scheme For Women: अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजना नक्की काय आहे? ते जाणून घ्या

Siddhi Hande

महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात महिला, मुलींचे शिक्षण, वारकरी संप्रदायासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून सरकार महिलांना मदत करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. २१-६० वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील. जुलै २०२४ पासून ही योजना सुरु होणार आहे. या योजनेसाठी ४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

राज्यातील दारिद्रयरेषेखालील महिला, घटस्फोटिक महिला, विधवा, सेवानिवृत्त महिलांना १२०० ते १५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.

महिलांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. त्याचसोबत मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. यात ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT