Atal Pension Yojana Saam Tv
बिझनेस

Atal Pension Yojana: उतारवयात पैशांची चणचण भासणार नाहीच! 210 रुपयांची गुंतवणूक करा; महिन्याला 5000 ची पेन्शन मिळवा, कसे ते जाणून घ्या

Retirement Plan : निवृत्तीनंतरही उत्पन्न मिळत राहावे असेल अनेकांना वाटते त्यामुळे आपण गुंतवणूकीची योजना करत असतो.

कोमल दामुद्रे

Atal Pension Yojana Benefit (In Marathi):

निवृत्तीनंतर आपल्या प्रत्येकाला पुढे काय ही चिंता सतत सतावत असते. निवृत्तीनंतरही उत्पन्न मिळत राहावे असेल अनेकांना वाटते त्यामुळे आपण गुंतवणूकीची योजना करत असतो.

परंतु, तुम्हाला माहित आहे का? सरकार आपल्याला अशा काही योजना देते ज्यामुळे उतारवयात आपल्याला पैशांची चणचण भासणार नाही. त्यातील एक योजना अटल पेन्शन. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

अटल पेन्शन योजनेत आपल्याला दरमहिन्याला २१० रुपये गुंतवावे (Investment) लागतील. निवृत्तीनंतर तुम्हाला 5,000 रुपये पेन्शन मिळेल . या योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके जास्त फायदे (Benefits) मिळतील. तुम्ही २१० रुपयांपेक्षा कमी पैशांची (Money) देखील गुंतवणूक करु शकता.

1. अटल पेन्शन योजना काय आहे?

९ मे २०१५ साली मोदी सरकारने ही अटल पेन्शन योजना राबवली. यंदा या योजनेला ८ वर्षे पूर्ण झाले आहे. या योजने जर गुंतवणूक करायची असेल तर वयाचे ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर आपल्याला निवृत्तीनंतर ५००० रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन दर महिन्याला मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्हाला 42 ते 210 रुपये द्यावे लागतील.

जर कोणी वयाच्या ४० व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करत असेल तर त्याला दरमहा १,४५४ रुपये गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे, 19 ते 39 वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी वेगळी रक्कम आहे.

2. अर्ज कसा कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत ऑनलाइन किंवा ऑफलाइन खाते उघडू शकता. त्यात तुम्ही सोयीनुसार रक्कम जमा करु शकता. या योजनेसाठी तुम्हाला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बचत बँक खाते असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT