ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांचे टेन्शन या आठवड्यात वाढणार आहे. मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ऐनसणासुदीच्या काळात सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांची लगबग पाहायला मिळेल. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.
1. आजचा सोन्याचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,250 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,170 रुपये होती. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,220 रुपयांनी वाढ झाली आहे.
2. चांदीचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७३५०० रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहे. तर आजही भाव जैसे थे असल्यामुळे खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची (Gold) किंमत ५९,०७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५९,०७० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०७० रुपये इतका असेल.
4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?
सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.