Income Tax Return saam tv
बिझनेस

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Income Tax Return: 31 जुलै 2026 पर्यंत ITR भरला नाही तर किती दंड भरावा लागेल, बिलेटेड रिटर्न कधीपर्यंत भरता येईल, नवीन आयकर कायदा लागू असूनही यंदा जुन्या कायद्यानुसार ITR का भरावा लागतो आणि करदात्यांनी कोणत्या महत्त्वाच्या नियमांची माहिती ठेवावी, हे सविस्तर जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही नोकरी करणारे असाल, पेन्शनधारक असाल किंवा घर, जमीन, शेअर्स, म्युच्युअल फंड यांसारख्या गुंतवणुकीतून नफा कमावत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे ज्यांचं उत्पन्न केवळ पगार आणि कॅपिटल गेनमधून आहे अशा करदात्यांनी 31 जुलै 2026 पर्यंत आयकर रिटर्न (ITR) दाखल करणं आवश्यक आहे.

अजूनही तुम्ही ITR भरला नसेल तर तुम्ही एकटे नाही. देशातील तब्बल 3 कोटींहून अधिक करदात्यांनी अद्याप रिटर्न भरलेला नाही. आयकर विभागाच्या e-Filing पोर्टलवर 14 कोटींपेक्षा जास्त करदाते आहेत. 21 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार 3.15 कोटी ITR दाखल करण्यात आलेत. त्यापैकी 2.96 कोटी रिटर्नचं Verification पूर्ण झालं असून 1.87 कोटी रिटर्नवर प्रक्रिया देखील पूर्ण झालीये.

31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर काय?

जर काही कारणामुळे 31 जुलैपर्यंत ITR भरता आला नाही तरीही रिटर्न दाखल करण्याची संधी उपलब्ध असते. याला बिलेटेड रिटर्न म्हणतात. हा रिटर्न 31 डिसेंबर 2026 पर्यंत भरता येतो.

मात्र, ही सुविधा विनामूल्य नाही. रिटर्न उशिरा भरल्यास भरायचा कर बाकी असेल तर त्यावर दर महिन्याला 1 टक्के व्याज आकारले जाते.

उशीर केल्यास 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत दंड

उशिरा ITR भरल्यास व्याजासोबत लेट फीही भरावी लागते. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 5,000 रुपयांचा दंड भरावा लागतो. तर 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी हा दंड 1,000 रुपये आहे.

याशिवाय आणखी एक मोठा तोटा होतो. शेअर्स, म्युच्युअल फंड, मालमत्ता विक्री किंवा व्यवसायात झालेला तोटा पुढील वर्षांच्या उत्पन्नातून Adjust करण्याची संधी गमवावी लागू शकते. त्यामुळे शक्यतो 31 जुलैपूर्वीच ITR दाखल करणं फायदेशीर ठरतं.

नवीन आयकर कायदा लागू झाला तरी यंदा जुन्याच कायद्यानुसार ITR का?

देशात नवीन आयकर कायदा 2025 लागू झाला असला तरी यंदा दाखल होणारे ITR अजूनही आयकर अधिनियम 1961 मधील नियमांनुसारच भरावे लागणार आहेत. यामागचं कारण म्हणजे सध्या दाखल केले जाणारे ITR हे कर Assessment Year 2026-27 साठी आहेत. हे रिटर्न आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारावर भरले जात आहेत.

हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2026 रोजी संपलं आणि त्या काळात जुना आयकर कायदाच लागू होता. त्यामुळे त्या वर्षातील उत्पन्नावर कर मोजणी, करसवलती आणि ITR दाखल करण्यासाठी 1961 च्या कायद्याचेच नियम लागू राहतील.

कोणत्या वर्षाला कोणता कायदा लागू होतो?

एखाद्या ITR वर कोणता आयकर कायदा लागू होईल हे रिटर्न कधी भरला यावर ठरत नाही. उत्पन्न कोणत्या कालावधीत मिळालं यावर ते अवलंबून असतं. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या ITR फाइलिंगमध्ये आयकर अधिनियम 1961 हाच लागू राहणार आहे.

नवीन कायद्यानुसार ITR कधी भरावा लागेल?

1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या नवीन कर वर्षात मिळालेल्या उत्पन्नासाठी प्रथमच नवीन आयकर कायद्यानुसार ITR दाखल केला जाणार आहे. म्हणजेच, त्या उत्पन्नाचा रिटर्न पुढील वर्षी नवीन कायद्याच्या नियमांनुसार भरावा लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या ITR फाइलिंगसाठी करदात्यांनी कर निर्धारण वर्ष 2026-27 साठी आयकर विभागाने जारी केलेले ITR फॉर्मच वापरावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

SCROLL FOR NEXT