Vande Bharat Sleeper Train saam Tv
बिझनेस

Vande Bharat Sleeper Train: मुंबई- दिल्लीचा प्रवास होणार सुसाट; देशात १० स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार, जाणून घ्या Routes अन् सोयी सुविधा

Vande Bharat Sleeper Train: भारतातील अनेक मार्गावर नव्या स्लीपर वंदे भार ट्रेन धावणार आहेत. भारतीय रेल्वे विभाग त्यादृष्टीने कामाला लागले आहे.

Bharat Jadhav

(Vande Bharat Sleeper Train Launch Date) देशात १० स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. भारतीय रेल्वे विभाग त्याबाबत सकारात्मक आहे. सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या सेटमध्ये एकूण १६ कोच असतील, त्यातून ८२३ प्रवाशी प्रवास करू शकतील. या रेल्वे गाड्यांमध्ये आधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जातील, त्यामुळे यातून प्रवास करणं सुखद अनुभव देणारे असेल. या स्लीपर वंदे भारत रेल्वेमध्ये वर्ल्ड-क्लास इंटीरियर्स आणि आधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येईल.

ईटी नाऊ या वृत्तसमुहाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलंय की, रेल्वे मंत्रालय आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ह्या ट्रेन सुरू करण्याची तयारीत आहे. यादृष्टीने रेल्वे विभाग कामाला लागले आहे. चालू आर्थिक वर्षात १० स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जातील. या ट्रेनमध्ये BEML च्या सहयोगाने बनवल्या जात आहेत. लॉन्चिंगची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाहीये, अशी माहितीही रेल्वे अधिकाऱ्याने दिलीय.

या मार्गांवर चालतील स्लीपर वंदे भारत ट्रेन

सध्या रेल्वेने वंदे भारत स्लीपर गाड्यांचे मार्ग अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत. परंतु असे सांगितलं जातंय की, या सेमी-हायस्पीड ट्रेन्स नवी दिल्ली-हावडा, सियालदाह-नवी दिल्ली, नवी दिल्ली-पुणे, नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-सिकंदराबाद अशा अनेक मार्गांवर चालवल्या जातील. आता वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती तीन कंपन्यांद्वारे केलं जाणार आहे.

बीईएमएल (BEML), काइननेट रेल्वे सॉल्यूशन्स लिमिटेड (Kinet Railway Solutions Ltd), आणि टिटागज रेल्वे सिस्टम्स लिमिटेड आणि भेल (BHEL) च्या सहभागाने या रेल्वे बनवल्या जात आहेत. या कंपन्या एकूण २१० वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करणार आहेत.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काय आहे वैशिष्ट्ये

वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे लांब पल्ल्याचा प्रवास सुखद होणार आहे. नेहमीसारख कंटाळवाणी प्रवास होणार नाही. या ट्रेन प्रवाशांना वर्ल्ड-क्लास प्रवास आणि छान सुविधा देण्यसाठी बनवण्यात येत आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनची बॉडी ऑस्टेनिक स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात येते. एका ट्रेनमध्ये १६ डबे असतील त्यातून ८२३ प्रवाशी एकाच वेळी प्रवास करू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Liver Symptoms On Skin: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसतायेत? असू शकतं लिव्हर बिघडल्याच लक्षण, वेळीच व्हा सावध

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

Vande Bharat Express : ४ नव्या वंदे भारत धावणार, कोणता आहे मार्ग? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT