Marriage Loan: लग्न करायचंय, पण हाती पैसा नाही? काळजी नको, खर्चासाठी मिळतंय कर्ज, कुठे कराल अर्ज जाणून घ्या

Wedding Loan Eligibility: आता लग्न करायचं म्हटलं तर त्याचा मोठा खर्च होत असतो. साधरण लग्न जरी म्हटलं तरी त्याचा खर्च ५ लाखांपर्यंत जात असतो. डेस्टिनेशन वेडिंगचा विचार केला तर हा खर्च १ कोटीपर्यंतही जात असतो.
Marriage Loan
Wedding Loan EligibilitySaam Tv
Published On

Marriage Loan: लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे मिलन नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. त्यामुळे भव्य मंडप, थीम सजावट,डेस्टिनेशन व्हेन्यूज, वधूच्या प्रवेशापासून ते चविष्ट जेवणापर्यंत,प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवश्यक असते. लग्नात दोन्ही कुटुंबाचा मान ठेवला जातो, त्यांच्या पसंतीच्या गोष्टी केल्या जातात. परंतु लग्नाच्या या सर्व गोष्टींसाठी मोठा पैसा लागत असतो.

'लग्न पहावे करून अन् घर पहावे बांधून' ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल.लग्नासाठी सर्व गोष्टींची जुळवणी करणे त्यासाठी लागणारा पैसा जोडणे ह्या गोष्टींना टेन्शन येत असतं. परंतु आपल्यातील बहुतेकांना माहिती नाहीये, लग्न खर्चासाठी बँकाही तुमच्या मदतीला येत असतात. हो, लग्न खर्चासाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात.

Marriage Loan
Government Scheme: मुलीच्या नावावर ५,००० ₹ गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील २७ लाख; सरकारची भन्नाट योजना

WedMeGoodच्या मते, २०२४ मध्ये भारतात फक्त ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सुमारे ४८ लाख लग्ने झाली आणि यामुळे ६ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. जर तुम्हीही लग्न करणार असाल आणि या मोठ्या खर्चाची काळजी करत असाल तर तुमचा ताण दूर होणार आहे. खरं तर, बाजारात अनेक बँका आहेत ज्या लग्नासाठी कर्ज देतात. तुमच्या भव्य लग्नासाठी तुम्ही लग्न कर्ज कसे मिळवू शकता हे जाणून घेऊ.

Marriage Loan
Post Office: महिलांसाठी वरदान आहेत पोस्ट ऑफिसच्या 'या' योजना; गुंतवणुकीवर बँकेपेक्षाही मिळतं जास्त व्याज

आजकाल सामान्य लग्नाचे बजेट ५ लाखांपासून सुरू होऊन २० लाखांपर्यंत पोहोचत असते. जर डेस्टिनेशन वेडिंगचा विचार केला तर त्याचा खर्च १ कोटीपर्यंतही जाऊ शकतो. WedMeGood च्या रिपोर्ट नुसार, २०२४ मध्ये लग्नावर सरासरी ३६.५ लाख रुपये खर्च झाला. ते २०२३ च्या तुलनेत ७ टक्के जास्त आहे.

तर डेस्टिनेशन वेडिंगमध्ये हा आकडा ५१ लाखांपर्यंत पोहोचलाय. वाढती महागाई आणि स्थळ आणि केटरिंग सारख्या गोष्टींच्या शुल्कात वाढ होत असल्याने लग्नाचा खर्च डोंगराएवढा होत असतो. भारतात लग्न संस्कृतीला खूप महत्त्व आहे.

लग्नासाठी कर्ज

जेव्हा लग्नाचा खर्च इतका वाढतो की बचत कमी पडते,तेव्हा लोक 'विवाह कर्ज'कडे वळतात. हे एक वैयक्तिक कर्ज आहे जे विशेषतः लग्नाशी संबंधित खर्चासाठी घेतले जात असते.लग्नाचे ठिकाण,सजावट,कपडे,फोटोग्राफी, किंवा पाहुण्यांचे राहण्याची सोय यासारख्या सर्व गोष्टींसाठी पैसा लागतो आणि तो पैसा कर्ज रुपातून उपलब्ध होत असतो. आता डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीसारखे क्लिष्ट राहिलेले नाहीये. लग्न कर्ज फक्त काही क्लिक्समध्ये मिळवता येते.

जास्त कागदपत्रे लागत नाहीत. फक्त मूलभूत तपशील भरा, केवायसी पूर्ण करून तुम्ही ईएमआय प्लॅन तुम्ही निवडू शकता.ते झाल्यानंतर काही मिनिटांत पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर होत असतात. तुम्हाला माहितीये १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देखील वार्षिक १२% या सुरुवातीच्या व्याजदराने उपलब्ध आहे.

लग्नासाठी कर्ज कोणाला मिळू शकते?

भारतात विवाह कर्जासाठी अर्ज करणारे अर्जदार २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. ते भारतीय नागरिक असले पाहिजेत. तसेच,नोकरी असो किंवा व्यवसाय, उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे. भारतात लग्न कर्जावरील व्याजदर तुमचे उत्पन्न,क्रेडिट स्कोअर आणि बँकेच्या अटींवर अवलंबून असतो. त्याचा व्याजदर १० टक्के ते २४ टक्के असू शकतो. सहसा कर्जाचा कालावधी १२ महिने ते ६० महिन्यांपर्यंत ठेवला जातो, ज्यामुळे तुम्हाला हप्ते कमी पैशांचे ठेवता येतात.

विवाह कर्ज कधीकधी आर्थिक भार कमी करण्यास मदत करते, परंतु ती एक जबाबदारी देखील असते. त्यामुळे तुम्हाला आवश्यक तेवढेच कर्ज घ्या आणि ते वेळेवर परतफेड करावे, नाहीतर त्याचं टेन्शन वाढत असते. त्यामुळे व्याजदरांची तुलना करून आपल्या उत्पन्नानुसार ईएमआय ठरवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com