Vande Bharat Express And Metro Ticket Fare Saam Tv
बिझनेस

Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस vs वंदे भारत मेट्रो vs वंदे भारत स्लीपर; कोणत्या ट्रेनचं किती तिकीट? जाणून घ्या

Vande Bharat Express And Metro Ticket Fare: आज राज्यात तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहे. या वंदे भारत ट्रेनचं तिकीट किती आहे ते जाणून घेऊया.

Siddhi Hande

राज्यात आजपासून तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. पुणे ते हुबळी, नागपूर ते सिंकदराबाद, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर तीन नव्या एक्सप्रेस सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच नाही तर स्लीपर ट्रेनपण सुरु होणार आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना स्लीपर ट्रेनने प्रवास करता येणार आहे. या ट्रेनसाठी तुम्हाला किती भाडे मोजावे लागणार आहे ते जाणून घेऊया.

वंदे भारत ट्रेन वेगवेगळ्या मार्गांवर धावते. ट्रेनच्या अंतरावर तिकीट अवलंबून असते. वंदे भारत ट्रेनचे तिकीट हे ८३० रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह चेअरकारचे तिकीट १६३५ रुपये आहे. तर कोटा ते उदयपूर जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट ७४५ रुपये आहे आणि चेअरकारचे तिकीट १४६५ रुपये आहे. त्यामुळे या नवीन तीन ट्रेनचे तिकीट अंतरावर अवलंबून असणार आहे.

वंदे भारत मेट्रो (Vande Bharat etro Ticket)

देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावणार आहे. वंदे भारत मेट्रोल गुजरातमधील भूजपासून ते अहमदाबादपर्यंत धावणार आहे. या वंदे भारत मेट्रोचे तिकीट ३० रुपये आहे. याचसोबत या मेट्रोचे मंथली आणि आठवड्याचे तिकीटदेखील तुम्ही खरेदी करु शकतात.

वंदे भारत स्लीपर कोच (Vande Bharat Sleeper Coach)

वंदे भारत स्लीपर कोच लवकरच भारतात धावणार आहे. या ट्रेनमध्ये थ्री टियर, टू टियर आणि फर्स्ट क्लास एसी कोच असणार आहे. यासाठी थर्ड एसी कोचचे तिकीट १५०० ते २००० रुपयांपर्यंत तिकीट असणार आहे. सेकंड एसी कोचसाठी २००० ते २५०० रुपये तिकीट असणार आहे. फर्स्ट क्लाससाठी ३००० ते ३५०० रुपये तिकीट असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT