Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक; IPS अंशिका वर्मा यांचा प्रवास

Success Story of IPS Anshika Sharma: आयपीएस अंशिकावर्मा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा खूप अवघड असते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी बसतात. परंतु खूप जणांना या परीक्षेत यश मिळते. अनेकांचे आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते यूपीएससी परीक्षा देतात. असंच यश आयपीएस अंशिका वर्मा यांना मिळालं आहे. त्या एक डॅशिंग पोलिस ऑफिसर आहेत.

कोण आहेत IPS अंशिका शर्मा?

अंशिका शर्मा या मूळच्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९९६ रोजी झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरी करत होते. आता ते रिटायर झाले आहे. प्रयागराज येथे सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर अंशिका यांना नोएडातील कॉलेजमधून बीटेक पूर्ण केले. त्यांना २०१८ मध्ये बीटेक पदवी प्राप्त केली. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.

सेल्फ स्डडी करुन यूपीएससी क्रॅक (Success Story of IPS Anshika Sharma)

बीटेक डिग्री प्राप्त केल्यानंतर अंशिका यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्धार केला. त्यांनी घरीच सेल्फ स्टडी केला. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला. सेल्फ स्टडी करुन त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. कितीही अपयश आले तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.

अंशिका यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली.दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले.

२०२१ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत १३६ रँक प्राप्त केली. त्यांनी सुरुवातीला फतेहपुर सीकरी ठाण्यात एसएचओ पदावर काम केले. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्या सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. ते नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

SCROLL FOR NEXT