UPS Scheme Saam Tv
बिझनेस

UPS Scheme: १० वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळणार पेन्शन, मासिक वेतनासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक

UPS Scheme Pension Calculation: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दहा वर्षांची सर्व्हिस केली तरी त्यांना दर महिन्याला १०,००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस स्कीम सुरु

दर महिन्याला मिळणार १०,००० रुपयांची पेन्शन

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना २००४ नंतर नोकरी लागली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता या कर्मचाऱ्यांचे एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्किमअंतर्गत कोणतेही नुकसान होणार आहे. या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइल पेन्शन स्कीम (UPS)सुरु करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२५ पासून ही नवीन स्कीम लागू केली आहे. या योजनेसाठी तुम्हाला रजिस्टर करावे लागेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळणार आहे.

यूपीएस आणि एनपीएसअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळते. या योजनेत सेवानिवृत्तीच्या आधी १२ महिने तुमच्या बेसिक पगारातील ५० टक्के रक्कम पेन्शन योजनेत जमा केली जाते. जर तुम्ही १० वर्षेदेखील नोकरी करत असाल तरीही तुम्हाला या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. फक्त इतरांच्या तुलनेत तुमची पेन्शन कमी असेल.

यूपीएस आणि एनपीएसमधील फरक (UPS And NPS Difference)

नॅशनल पेन्शन स्कीम ही मार्केटवर आधारित असते. त्यामुळे मार्केटमध्ये चढ-उतार झाले तर पेन्शनच्या रक्कमेतदेखील बदल होते. दरम्यान, यूपीएसमध्ये तुम्ही १० वर्षांची नोकरी केली तर तुम्हाला दर महिन्याला १०,००० रुपयांची गॅरंटीड पेन्शन मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांना होणार फायदा

यूपीएसअंतर्गत फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. जे कर्मचारी २००४ नंतर नोकरीला लागले आहेत आणि एनपीएसअंतर्गत त्यांचे रजिस्ट्रेशन आहे. ते कर्मचारी या योजनेत स्विच करु शकतात. दरम्यान, यासाठी १ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT