Online Payment Trend Saam Tv
बिझनेस

UPI Payment Trend: डिजिटल पेमेंटमुळे लोकांचा वाढला अधिकचा खर्च, फक्त इतक्या लोकांना झाला फायदा; सर्व्हेतून माहिती उघड

Online Payment Trend Increasing: सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. अगदी कोणतीही गोष्ट आपण ऑनलाइन पेमेंट करुन सहजरित्या खरेदी करु शकतो. ऑनलाइन पेमेंटमुळे लोकांचा खर्च खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. याबाबत आयआयटी दिल्लीने सर्व्हे केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. अगदी कोणतीही गोष्ट आपण ऑनलाइन पेमेंट करुन सहजरित्या खरेदी करु शकतो. मॉलपासून ते अगदी भाजीविक्रेत्यांकडेही यूपीआय पेमेंट सुरु आहे. त्यामुळे आजकाल अनेक जम रोख रक्कम घेऊन घराबाहेर जात नाही. ऑनलाइन पेमेंटचा खूप फायदा लोकांना होत आहे. मात्र, त्याचसोबत ऑनलाइन पेमेंटमुळे लोकांचा खर्च खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. याबाबत आयआयटी दिल्लीने सर्व्हे केला आहे.

आयआयटी दिल्लीच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, सर्वाधिक लोकांना असे वाटत आहे की ते यूपीआय पेमेंटचा वापर करुन जास्त खर्च करत आहे. युपीआय पेमेंटचे अॅप हे वापरण्यासाठी अगदी सोपे आहे. क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करता येते. त्यामुळेच लोक ऑनलाइन पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करतात. परंतु याचसोबत ऑनलाइन पेमेंटचा वापर करुन लोक आवश्यक खर्चाशिवाय जास्त खर्च करत असल्याचे दिसत आहे. लोक रोख रक्कम देऊन कमी खर्च करत होते. असं या अभ्यासातून समोर आले आहे. (Almost 75 percent people overspending through digital payment)

आयआयटी दिल्लीने असिस्टंट प्रोफेसर ध्रुव कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व्हे केला आहे. यातून ७४.२ टक्के लोक यूपीआयचा वापर करुन जास्त खर्च करत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांनी सांगितले आहे की, पूर्वी जेव्हा रोख रक्कमचा वापर व्हायचा तेव्हा लोकांच्या मानसिकतेवर परिणाम व्हायचा. जास्त पैसे खर्च करु नये, असे त्यांना वाटायचे. परंतु आता यूपीआय पेमेंटमुळे त्यांची मानसिकता बदलली आहे. लोक यूपीआय पेमेंटचा जास्त वापर करतात.

यूपीआय पेमेंटचा वापर करुन व्यव्हार करणे खूप सोपे झाले आहे. लोकांना व्यव्हार करण्यासाठी जास्त काही करावे लागत नाही. रोख रक्कम देताना जास्त वेळ खर्च व्हायचा. त्यामुळेच लोक यूपीआय पेमेंटचा पर्याय वापरु लागले आहे. यूपीआय पेमेंटचा वापर आता सर्व ठिकाणी होऊ लागला आहे. लाईट बिल, पाणी बिल ते अगदी लहान सहान गोष्टी खरेदी करण्यासाठी यूपीआयचा पेमेंट वापर केला जातो. परंतु या यूपीआय पेमेंटचा फायदा ७ टक्के लोकांना झाला असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पेमेंटच्या वापरामुळे खर्च अधिक वाढल्याचे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.

२०१६ मध्ये यूपीआय पेमेंट लाँच झाले. तेव्हापासून लोकांमध्ये डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे. कोविडच्या काळात यूपीआय पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. या काळात शारिरिक संपर्क रोखण्यासाठी लोकांनी ऑनलाइन पेमेंटचा मार्ग स्विकारला. ऑनलाइन पेमेंट करणे लोकांना सुरक्षित वाटू लागले. त्यानंतर आता सर्वत्र यूपीआयचा वापर केला जातो. भारतात तर ऑनलाइन पेमेंट सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT