UPI वर आता क्रेडिट लाईनची सुविधा सुरू होणार आहे.
ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारे थेट लहान कर्ज मिळू शकणार आहे.
रिझर्व्ह बँकेने या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
बँकेत न जाता तात्काळ कर्ज घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
तुम्हाला वेळोवेली पैशांची गरज पडते? तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करताय? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमची आर्थिक चणचण तुमच्या मोबाईल दूर करणार आहे. कारण बऱ्याच प्रतीक्षेनंतर, UPI वर क्रेडिट लाइनची सुविधा सुरू होणार आहे. बँका UPI अॅप्सद्वारे ग्राहकांना थेट लहान कर्जे देण्याची योजना तयार करत आहेत.
रिझर्व्ह बँकेने या सुविधेसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. जर ही योजना खरोखरच अंमलात आली तर ग्राहकांना छोट्या कर्जासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.
फिनटेक क्षेत्राच्या एका संस्थापकाच्या मते, नवीन ग्राहकांपर्यंत (ज्यांचे बँक खाते नाही) पोहोचण्यासाठी बँका UPI वर लहान क्रेडिट लाइन्स ऑफर करतील. यासाठी PhonePe, Paytm, BharatPe आणि Navi सारख्या अॅप्सचा वापर केला जाईल. आयसीआयसीआय सारख्या मोठ्या बँका आणि कर्नाटक बँकेसारख्या छोट्या बँका देखील या उत्पादनाचे प्रमाण वाढवण्याची तयारीत आहेत.
दरम्यान या नवीन उत्पादनाबाबत बँकांनी रिझर्व्ह बँकेला अनेक प्रश्न विचारले होते. या व्याजमुक्त कालावधी, थकबाकीची रक्कम नोंदवणे आणि क्रेडिट ब्युरोला माहिती पाठवण्याची पद्धत. आता आरबीआयने या मुद्द्यांवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यानंतर त्याची चाचणी सुरुवातीच्या पातळीवर सुरू झालीय.
UPI प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या NPCI ने सप्टेंबर 2023 मध्येच प्री- मंजुरी क्रेडिट लाइन सुविधा सुरू केली. परंतु तांत्रिक अडचणींमुळे बहुतेक बँका ही सुविधा सुरू करू शकल्या नाहीत. आता परिस्थिती बदलत आहे आणि बँका ते स्वीकारत आहेत. १० जुलै रोजी एनपीसीआयने बँकांना एक अधिसूचना जारी केली की, या पद्धतीने जे काही कर्ज दिले जाते ते त्याच उद्देशासाठी वापरावे ज्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
सोने कर्ज
मुदत ठेवीवर कर्ज
ग्राहक कर्ज
वैयक्तिक कर्ज इत्यादी.
याचा अर्थ असा की ग्राहकाचे क्रेडिट खाते थेट UPI अॅपशी जोडले जाईल आणि तेथून लहान कर्जे घेता येतील. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, क्रेडिट हे UPI साठी पुढचे मोठे पाऊल ठरेल. सध्या UPI चे सुमारे 30 कोटी वापरकर्ते आहेत, त्यापैकी 1520 कोटी सक्रिय युझर्स आहेत.
पण गेल्या काही महिन्यांपासून UPI ची वाढ मंदावलीय, त्यामुळे क्रेडिट लाईन त्याला एक नवीन चालना देऊ शकते. बँकांना बॅकएंड पायाभूत सुविधा पुरवणारी फिनटेक कंपनी Zeta च्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत UPI वर 1 ट्रिलियन डॉलर्सचे व्यवहार होऊ शकतात. दरम्यान या सुविधेप्रकरणी एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, जर कर्जाची काळजीपूर्वक अंमलबजावणी केली नाही तर थकबाकी वाढू शकते आणि लहान कर्जे वसूल करणे हे एक मोठे आव्हान बनू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.