Upcoming Scooters Google
बिझनेस

Upcoming Scooters: आकर्षक लूक आणि उत्तम फीचर्ससह या वर्षी लाँच होणार ५ जबरदस्त स्कूटर; पाहा लिस्ट

Upcoming Scooters In India: भारतीय बाजारपेठेत लवकरच नवीन स्कूटर लाँच होणार आहे. यात ककाही इलेक्ट्रिक स्कूटरचादेखील समावेश आहे. या स्कूटर वर्षाच्या अखेरीसपर्यंत लाँच होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत ही जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक बाजारपेठांपैकी एक आहे. यामध्ये अनेक बाईक आणि स्कूटरचा समावेश होतो. अनेकजण स्कूटर घेण्यास प्राधान्य देतात. सर्वात जास्त स्कूटर या महिला चालवतात. उत्तम रायडिंग अनुभवामुळे अनेकांनी स्कूटर घेण्यास पसंती दर्शवली आहे. येत्या काही दिवसात बाजारात अनेक स्कूटर लाँच होणार आहेत. याच स्कूटरची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Hero Xoom 160

Hero MotorCorp कंपनी लवकरच प्रीमियम सेगमेंटमधील आपली पहिली स्कूटर Hero Xoom 160 लाँच करणार आहे. २०२४ च्या शेवटी ही स्कूटर लाँच होऊ शकते. या स्कूटरमध्ये 160cc लिक्विड कूल्ड इंजिन मिळेल.

Hero Xoom125R

२०२४ मध्ये Hero MotorCorp कंपनी Hero Xoom 125R ही स्कूटर लाँच करेल. ही स्कूटर स्पोर्टी लूकसह बाजारात येणार आहे. स्कूटरमध्ये 124.6 cc एअर कूल्ड इंजिन दिले जाईल. जे 9.4 bhp आणि 10.16 Nm टॉर्क जनरेट करेल.

Bajaj Chetak

कंपनी या वर्षात बजाज चेतकचे नवीन व्हेरियंट लाँच करणार आहे. ही स्कूटी सर्वसामान्य लोकांना परवडणारी असेल. ही इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. ही स्कूटर 2.9 kWh बॅटरी बॅकअपसह येईल. या स्कूटरची किंमत १ लाखांपेक्षा कमी असेल, असं सांगण्यात येत आहे.

suzuki Access 125

suzuki Access 125 ही स्कूटर सर्वाधिक विकली जात आहे. लवकरच या स्कूटरमध्ये मिड- लाइफ फेसलिफ्ट अपडेट मिळणार आहे. या वर्षाच्या शेवटी ही स्कूटर लाँच होण्याची शक्यता आहे.

BMW CE02

BMW CE02 ही स्कूटर या वर्षात लाँच होणार आहे. आकर्षक लूक आणि उत्तम फीचर्ससह स्कूटर बाजारात उपलब्ध होणार आहे. ही देशातील सर्वात महाग इलेक्ट्रिक स्कूटर असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT