Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चसाठी तयार, Ola आणि TVS देणार टक्कर

Bajaj Affordable Electric Scooter: दुचाकी उत्पादक कंपनी Bajaj आपल्या नवीन परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत आहे. ज्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.
Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चसाठी तयार, Ola आणि TVS देणार टक्कर
Bajaj Upcoming Electric Scooter Saam Tv
Published On

बजाज ऑटोने अलीकडेच आपली इलेक्ट्रिक स्कूटर चेतक अपडेट करत याचा अर्बन व्हेरिएंट लॉन्च केली होती. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.23 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र तरीही अनेकांना ही स्कूटर परवडलेच, असं नाही. कारण आधीच बाजारात यापेक्षा कमी किंमतीत TVS मोटर्स आणि Ola इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.

अशातच आता अशी बदामी समोर येत आहे की, बजाज ऑटो आता नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत आहे. ज्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चसाठी तयार, Ola आणि TVS देणार टक्कर
399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?

नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.2kWh चा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. याची रेंज 80 ते 100 किलोमीटरपर्यंत असू शकते. यात फास्ट चार्जिंगची सुविधाही असेल. तसेच नवीन मॉडेलचे डिझाईन सध्याच्या चेतकच्या मॉडेलप्रमाणेच असेल. याच्या फक्त बॅटरी पॅक आणि इतर मूलभूत फीचर्समध्ये काही बदल झाल्याचं पाहायला मिळेल.

सध्याच्या मॉडेलवर मिळत आहे मोठी सूट

दरम्यान, जर तुम्ही या महिन्यात बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्यावर 20,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. पण ही ऑफर काही दिवसांसाठीच आहे. ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी, बजाज शोरूमशी संपर्क साधा.

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चसाठी तयार, Ola आणि TVS देणार टक्कर
Hero Splendor Plus ची स्पेशल एडिशन लॉन्च, देते 73kmpl चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

TVS iQube चा स्वस्त व्हेरिएंट 2 तासात होतो पूर्ण चार्ज

अलीकडेच TVS ने iQube इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube (2.2 kWh) चा नवीन व्हेरिएंट बाजारात आणला आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 94,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर 2 तासात 80% पर्यंत चार्ज होते. याची ड्रायव्हिंग रेंज 75 किलोमीटर आहे. या स्कूटरमध्ये 32 लीटर अंडर सीट स्टोरेज ग्राहकांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com