Upcoming EVs  Saam Tv
बिझनेस

Upcoming EVs In 2024: टाटा, महिंद्रा आणि मारुतीच्या नवीन EV येत्या वर्षात होणार लाँच; पाहा लिस्ट

New Year Electric Vehicle : देशात सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढत आहे. येत्या वर्षात काही नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. या नवीन कारची यादी जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Electric Vehicle Launch In 2024:

देशात सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढत आहे. इलेक्ट्रिक कार पर्यावरणपुरक असतात. त्यामुळे ग्राहकांचा पेट्रोल डिझेलऐवजी इलेक्ट्रिक कार घेण्याकडे कल जास्त आहे. येत्या वर्षात काही नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. या नवीन कारची यादी जाणून घ्या.

Maruti Suzuki eVX

मारुती सुझुकी ही कार उत्पादनातील नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी २०२४ मध्ये इलेक्ट्रिक सेंगमेंटमधील त्यांची पहिली कार लाँच करणार आहे. कंपनीची eVX इलेक्ट्रिक एसयूवी या वर्षात जानेवारी महिन्यात ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ही कार जानेवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. eVX Electric SUV एका चार्जमध्ये 550 किमी रेंज देईल. ही कार 60kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल.

Tata Harrier EV

टाटा मोटर्सची Tata Harrier EV येत्या वर्षात लाँच होणार आहे. Harrier EV या वर्षी ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. Gen 2 EV नवीन फीचर्स आणि Harrier EV V2L आणि V2V चार्जिंग फीचर्ससह बाजारात लाँच होणार आहे.

Mahindra XUV.e8

महिंद्रा अँड महिंद्रा ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील अग्रेसर कंपनी आहे. कंपनी लवकरच XUV700 वर आधारित इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. ही महिंद्राची दुसरी इलेक्ट्रिक कार असेल. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ऑगस्टमध्ये त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर आता Mahindra XUV.e8 लाँच होणार आहे. ही कार ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स तसेच ऑल-व्हील ड्राइव्ह टेक्नोलॉजीसह येण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT