केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या रविवारी, १ फेब्रुवारीला २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. हा केंद्रीय अर्थसंकल्प एका दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. कारण १ फेब्रुवारी रोजी सुट्टीचा दिवस अर्थात रविवार असूनही, या दिवशी संसदेत अर्थसंकल्प मांडला जाईल.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मागील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार याबाबतची घोषणा केली होती. तसेच तारीखही जाहीर केली होती. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या संसदेत सादर करणार आहेत. सीतारामन यांच्या दृष्टीने देखील हा एक विक्रमच ठरणार आहे. देशाच्या अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक काळ काम करणाऱ्या त्या मंत्री ठरणार आहेत.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत होणार आहे. २८ जानेवारीपासून ते २ एप्रिल या कालावधीत हे अधिवेशन पार पडेल. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर संसदेत सादर होणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प आगामी वर्षासाठीच्या अंदाजित जमा आणि खर्चाचं पत्रक असतं. संविधानातील अनुच्छेद ११२ अन्वये देशाच्या आर्थिक विकासाचा मार्ग निश्चित करणारा देशाचा अर्थसंकल्प १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संसदेच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही सभागृहांत मंजूर होणं अत्यावश्यक आहे.
देशाचा आर्थिक रोडमॅप ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याच्या साधारण सहा महिने आधी म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येच सुरू होते. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी किंवा प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्याआधी अर्थमंत्री या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करतात. त्यात अर्थतज्ज्ञ, शेतकरी, विविध संघटना, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, राज्य सरकार तसेच विविध मंत्रालयांतील अधिकाऱ्यांचा समावेश असतो.
मागील वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत विचार केला तर, यावर्षीचा अर्थसंकल्प विविधांगाने विशेष मानला जात आहे. बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच रविवारी संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्चर, शहर विकास, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो सेक्टर, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, एमआसएमई, रिन्यूएबल एनर्जी, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रीत केलं जाईल अशी अपेक्षा आहे.
लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचं अर्थसकल्पीय भाषण होईल. १ फेब्रुवारी, रविवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. संसद टीव्ही आणि डीडी न्यूज, तसेच संसद टीव्हीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर अर्थसंकल्पीय भाषण लाइव्ह बघता येईल.
याशिवाय https://saamtv.esakal.com/ च्या वेबसाइटवर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून ठळक मुद्दे, महत्वाच्या घोषणांचे अपडेट, राजकीय क्षेत्रातून अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया, उद्योग क्षेत्रातील प्रतिसाद, विशेषज्ज्ञांची मते याबाबत अपडेट्स देण्यात येतील. SAAM TV वर लाइव्ह बघता येईल. तसेच साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात अपडेट्स बघता येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.