रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपातीनंतरही युनियन बँक एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहे.
२ वर्षांच्या एफडीवर ६.५०% ते ७.२५% पर्यंत व्याजदर मिळतो.
ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ७.३५% व्याजदराचा लाभ.
२ लाख रुपयांच्या एफडीवर मॅच्युरिटीवेळी ३०,९०८ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळते.
रिझर्व्ह बँकेनं या वर्षी रेपो दरात १.०० टक्के कपात केली आहे. आरबीआयने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो दर कमी केला होता. परंतु ऑगस्टमध्ये रेपो दर ५.५० टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने रेपो दर कमी केल्यानंतर, सर्व बँकांनेही एफडीचे व्याजदर कमी केले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियानं एफडी व्याजदर कमी केले असले तरी, अजूनही ग्राहकांना आकर्षक परतावा देत आहे.
युनियन बँक इंडिया एफडीवर जास्तीत जास्त ७.३५ टक्केव्याजदर देत आहे. या बँकेत ग्राहकांना किमान ७ दिवसांपासून ते जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडता येते. सध्या ही सरकारी बँक ३.४० टक्के ते ७.३५ टक्के व्याज देत आहे.
युनियन बँक एफडी व्याजदर
सामान्य नागरिकांना - २ वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के व्याज.
ज्येष्ठ नागरिकांना - २ वर्षांच्या एफडीवर ७.०० टक्के व्याज.
अति ज्येष्ठ नागरिकांना - २ वर्षांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज.
तसेच वेगवेगळ्या कालावधींवर सर्वाधिक व्याजदर अनुक्रमे ६.६०टक्के, ७.१० टक्के आणि ७.३५ टक्के इतका आहे.
गुंतवणूक आणि परतावा
जर तुम्ही २ लाख रूपये २ वर्षांच्या एफडीमध्ये जमा केले तर, मॅच्युरिटीवेळी २,२७,५२८ रूपये मिळतील. (२७, ५२८ व्याज).
ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटीवेळी २,२९,७७६ रुपये मिळतील (२९,७७६ रुपये व्याज).
अति ज्येष्ठ नागरिकांना मॅच्युरिटीवेळी २,३०,९०८ रुपये मिळतील (३०,९०८ रुपये व्याज).
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.