Finance News Saam Tv
बिझनेस

Finance News: बँकांमध्ये दावा न केलेली करोडांची रक्कम आहे तरी कोणाची? यात तुमचे पैसे तर नाही अडकले

Unclaimed Amount: गेल्या पाच वर्षांत बचत खाते आणि एफडीमध्ये पाच हजार कोटींपेक्षा जास्त दावा न केलेली रक्कम पडून आहे. आता ही रक्कम लवकरात लवकर निकाली काढण्यास येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये दावा न केलेले (अनक्‍लेम्‍ड रक्कम )३२,९३४ कोटी रुपये होती. ही रक्कम मार्च २०२३च्या अखेरीस )३२,९३४ कोटी रुपये होती.आता भारतीय बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम (अनक्‍लेम्‍ड) वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार दावा न केलेल्या रकमेत २६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. बँकांमध्ये आता ७८,२१३ कोटी रुपये दाव न केलेली रक्कम आहे.

दरवर्षी अनक्‍लेम्‍ड रक्कम वाढत आहे

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, गेल्या २०२२ या आर्थिक वर्षात सार्वजनिक तसेच खाजगी (Private)क्षेत्रातील बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम तब्बल ३२ हजार ९३४ कोटी रुपये होती.परंतु त्याच्या तुलनेत मार्च २०२३ च्या शेवटी ही रक्कम ४२, २७२ करोड रुपये झाली. या कालावधीच्या दरम्यान २८ टक्के रक्कमेत वाढ झाली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार दावा न केलेल्या रक्कमेमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता ही रक्कम ७८, २१३ करोड रुपये झाली आहे.

दावा न केलेली रक्कम (अनक्‍लेम्‍ड) म्हणजे काय?

वेगवेगळ्या बँका दरवर्षी खात्यांचे पुनरावलोकन करतात. यामध्ये कोणत्या खात्यांमध्ये व्यवहार झाला नाही हे सुद्धा कळते. गेल्या १० वर्षात कोणत्याही ठेवीदाराकडून कोणत्याही खात्यात कोणतीही रक्कम (Amount) जमा केली जात नाही किंवा त्यातून कोणतीही रक्कम काढली जात नाही, तेव्हा या कालावधीत खात्यात असलेली रक्कम दावा न केलेली ठेवी रक्कम मानली जाते. बँका या रक्कमेबाबत ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात.

बँका आरबीआयला माहिती पुरवतात

बँकांकडून आरबीआयला ज्या खात्यांमध्ये दावेदार नाहीत अशा खात्यांची माहिती दिली जाते. त्यानंतर ही अनक्‍लेम्‍ड रक्कम शिक्षण आणि जागरूकता या विभागात निधी म्हणून हस्तांतरित केली जाते.

आरबीआयची जनजागृती मोहीम

आरबीआय लोकांना स्वत:चा हक्क मिळवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवत असते. ठेवीदाराचा मृत्यू होणे तसेच त्यांच्या नॉमिनीची नोंद कागदपत्रांमध्ये न केल्यामुळे आणि त्या रक्कमेचा कोणी दावेदार नसल्यामुळे दावा न केलेल्या ठेवींच्या संख्येत वाढ होते. आरबीआय ने दिलेल्या सूचना सर्व व्यापारी बँका आणि देशातील सर्व सहकारी बँकांवर १ एप्रिलपासून लागू होतील.

अनक्‍लेम्‍ड रक्कमेचा दावा कसा करावा?

तुमच्या नातेवाईकांची किंवा घरच्यांची रक्कम बँकेत दावा न करता पडून असेल तर तुम्ही आरबीआय च्या UDGAM पोर्टलद्वारे त्या रक्कमेवर दावा करू शकता. याद्वारे तुम्ही थेट बँकेशी संपर्क साधू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संभाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावरून बच्चू कडूंवर संताप

Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

Shaniwar Wada Namaz Row : खासदार मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे कडाडल्या

Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

Banjara Community : बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक; एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT