Dhule Bajar Samiti : तोलाई, हमालीचा खर्च टाळण्यासाठी कांदा खाजगी बाजार समितीत; कांद्याची वाढली आवक

Dhule News : कांदा उत्पादक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे आपला कांदा विक्रीसाठी न नेता खाजगी बाजार समितीत आपल्या शेतातील पिकवलेला कांदा विक्रीसाठी नेत असल्याचे दिसून येत आहे.
Dhule Bajar Samiti
Dhule Bajar SamitiSaam tv

धुळे : कांदा काढणीला सुरवात झाल्याने बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शेतकरी कांदा घेऊन जात आहे. परंतु (Bajar Samiti) बाजार समितीमध्ये हमाली, तोलाई व मापाई लागत असल्याने ती टाळण्यासाठी खासगी बाजार समितीत कांदा नेला जात आहे. यामुळे (Dhule) धुळे तालुक्यातील मोराणे येथील प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. (Breaking Marathi News)

Dhule Bajar Samiti
Jalgaon News : देवीच्या दर्शनाला गेले असता घडली दुर्दैवी घटना; अंघोळीसाठी नदीत गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

कांदा (Onion) उत्पादक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे आपला कांदा विक्रीसाठी न नेता खाजगी बाजार समितीत आपल्या शेतातील पिकवलेला कांदा विक्रीसाठी नेत असल्याचे दिसून येत आहे. या बाजार समितीत शेतकऱ्यांना तोलाई, मापाई त्याचबरोबर हमाली द्यावी लागत नसल्यामुळे हा अतिरिक्त खर्च (farmer) शेतकऱ्यांचा वाचत आहे. यामुळे शेतकऱ्यांना येथे कांदा विकणे फायद्याचे ठरत असल्याने या ठिकाणी कांद्याची आवक वाढली असल्याचे प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Dhule Bajar Samiti
Nagpur Goa Highway : नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेकापचा विरोध; बीड जिल्ह्यात महामार्ग होऊ न देण्याचा दिला इशारा

अगोदरच दर कमी 
सध्या बाजारामध्ये ८०० ते १५०० रुपये इतका दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. यात बाजार समितीमध्ये तोलाई, मापाई त्याचबरोबर हमाली देखील घेतली जाते. यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा अगदीच कमी फायदा होत असतो. हा खर्च खासगी बाजार समितीत वाचत असल्यामुळे व आधीच कांद्याला भाव कमी असताना हा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांचा वाचू लागला असल्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी आपला माल विकण्याची लगबग बघावयास मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com