Jalgaon News : देवीच्या दर्शनाला गेले असता घडली दुर्दैवी घटना; अंघोळीसाठी नदीत गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

Jalgaon News : जळगाव- यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदीच्या काठावर हे मंदिर असून चैत्र नवरात्री उत्सवानिमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी जातात
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

यावल (जळगाव) : चैत्र नवरात्री असल्याने अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. अशाच प्रकारे (Jalgaon) जळगावपासून काही अंतरावर असलेल्या शिरागड (ता. यावल) येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. तापी नदीत अंघोळीसाठी उतरले असता पाण्यात बुडून या दोघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना १५ एप्रिलला दुपारी घडली.   (Tajya Batmya)

Jalgaon News
Shirpur Police : लसणाच्या आडून अफूची अवैधपणे वाहतूक; ट्रकसह दोघे ताब्यात, शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

यावल (Yawal) तालुक्यातील शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. जळगाव- यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदीच्या काठावर हे मंदिर असून चैत्र नवरात्री उत्सवानिमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी जातात. दरम्यान, १५ एप्रिलला दुपारी येथे जळगावातील रहिवाशी असलेले रोहन काशिनाथ श्रीखंडे (वय १७) व प्रथमेश शरद सोनवणे (वय १७) हे दोघे गेले होते. त्यांनी देवीचे दर्शन घेतले व त्या नंतर ते (Tapi River) तापी नदीत अंघोळ करण्यास गेले असता नदीत उतरले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon News
Nashik News : तर लोकप्रतिनिधींनी आता मत मागायला येऊ नये; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फलक लावून विरोध

खोल पाण्यात उतरले 

दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही खोल पाण्यात बुडाले. आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com