Jalgaon Crime : गर्दीचा फायदा घेत चोरट्याने केला हात साफ; महिलेच्या पर्समधून दागिने लांबविले 

Jalgaon News : जळगावच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्यांची पर्स कापून दागिने व रोख रक्कम लांबविल्याच्या दिन घटना घडल्या आहेत.
Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv

जळगाव : लग्नसराई, सण उत्सव असल्याने सध्या मार्केटमध्ये खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र या गर्दीचा फायदा चोरटे उचलत आहेत. अशाच प्रकारे जळगावच्या (Jalgaon) मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्यांची पर्स कापून दागिने व रोख रक्कम लांबविल्याच्या दिन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांत (Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Breaking marathi News)

Jalgaon Crime
Onion Price : अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याने शेतकऱ्यांकडून कांदा साठवणूक

जळगाव शहरातील फुले मार्केट व सराफ बाजार परिसरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे. या ठिकाणी भुसावळ (Bhusawal) येथील ज्योती सचिन खरात (वय ३०) या जळगाव सराफ बाजारात सोन्याची पोत दुरुस्ती करण्यासाठी आल्या होत्या. (Crime News) त्यांनी पर्समध्ये छोट्या पाकीटात ही तुटलेली पोत ठेवली होती. पोत दुरुस्तीला जाण्यासाठी ज्योती खरात या दुपारी टॉवर चौकात आल्या. सुरवातीला त्यांनी फुले मार्केटमध्ये खरेदी केली. तेथून केळकर मार्केट येत असताना, काही वेळातच अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स धारदार ब्लेडने कापून त्यातील पोत असलेले छोट्या पाकीटातील १ लाख ३५ हजार ५३५ रुपयांचे मणी- मंगळसूत्र, वाट्या असा ऐवज चोरून नेला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Crime
Gas Cylinder Leakage : गॅस गळतीमुळे सिलेंडरने घेतला पेट; लहान मुलांसह ९ जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती गंभीर

३० हजाराची रोकड लांबविली 

दुसऱ्या एका घटनेत चणे, फुटाणे विक्री करून नवा माल घेण्यासाठी महिलेने घरातील रोकड व माल विकून आलेली रक्कम, असे ३० हजारांची रोकड पिशवीत भरून टॉवर चौकात आली. महिला चालत असतानाच चोरट्याने त्यांच्या पिशवीतील ३० हजारांची रोकड अलगद काढून घेत पसार झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com