Gas Cylinder Leakage : गॅस गळतीमुळे सिलेंडरने घेतला पेट; लहान मुलांसह ९ जण गंभीर जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Amravati News : सिलेंडरचा स्फोट होईल या भीतीने महिलांनी सिलेंडर बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. यात घरात उपस्थित चार लहान मुलांसह पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
Gas Cylinder Leakage
Gas Cylinder LeakageSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी शहरातील बुधवारा येथे दुपारच्या सुमारास घरगुती सिलेंडरमधुन (Gas) गॅस गळती झाल्यामुळे घरात सिलेडरचा भीषण अपघात झाला. (Amravati) या अपघातात लहान मुलांसह ९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Gas Cylinder Leakage
Amravati Lok Sabha : निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या सहा उमेदवारांना नोटीस; ४८ तासात खर्च सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमरावती जिल्ह्यातील बुधवारा येथील शिवा चिन्ना गौर व घरातील पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले होते. घरी सर्व महिला उपस्थित होत्या. घरात असलेल्या नवीन सिलेंडरमधून (Gas Cylinder) गॅस गळती होत असल्याने त्यांच्या घरी असलेल्या सिलेंडर टाकीने अचानक पेट घेतला. सिलेंडरचा स्फोट होईल या भीतीने महिलांनी सिलेंडर (Gas Leak) बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. यात घरात उपस्थित चार लहान मुलांसह पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारती शिवा गौर (वय ५०), गंगाबाई रामलाल गौर (वय ७०), उमा लखन गौर (वय ५०), निकिता अक्षय गौर (वय ३०), ममता संतोष गौर (वय ३५), हंसिका संतोष गौर (वय १२), हंसिका मनीष गौर (वय ९), आयुष अक्षय गौर (वय ३), पियूष अक्षय गौर (वय ६) असे नऊ जण जखमी झालेल्यांची नावे आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gas Cylinder Leakage
Onion Price : अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याने शेतकऱ्यांकडून कांदा साठवणूक

घटनेची माहिती बुधवारा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे उपचारासाठी दाखल केले. डॉ. अमोल नालट, डॉ. तरुण पटेल व त्यांच्या टीमने जखमींवर प्राथमिक उपचार केले. जखमींमध्ये निकिता अक्षय गौर ही जास्त प्रमाणात भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com