Shaniwar Wada Namaz Row : खासदार मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे कडाडल्या

Shaniwar Wada Namaz Row update : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या भूमिकेविरोधात रुपाली ठोंबरे यांनी आंदोलन केलं.
Rupali Patil Thombare
Shaniwar Wada Namaz RowSaam tv
Published On
Summary

शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला फुटलं तोंड

नमाज पठणावरून खासदार खासदार मेधाताई कुलकर्णी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी या प्रकारावर दिली जोरदार प्रतिक्रिया

शनिवारवाडा हा छत्रपतींचा आहे, तुमच्या बापाचा नाही,” असा रुपाली ठोंबरेंचा घणाघात

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: शनिवारवाडा येथे काल मुस्लिम महिलांच्या नमाज पठणच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवार वाडा येथे आक्रमक आंदोलन करण्यात आलं. यावेळी शनिवारवाडा पटांगणात असलेली मजार काढण्यात यावी, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांकडून करण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याच शनिवारवाड्यात आंदोलन करत पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Rupali Patil Thombare
Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

शनिवारवाडा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व धर्मीय लोकांच्या उपस्थितीत खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली.

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काल खासदार मेधा कुलकर्णी यांनी येथे येऊन स्टंटबाजी केली. त्यांनी जे बेकायदेशीर कृत्य केलं. तसेच सणासुदीच्या दिवसांत हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन केलं.

Rupali Patil Thombare
Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

शनिवारवाडा मराठा सम्राट पेशवे यांचं मुख्यालय होतं. त्यातील मजार १९३६ मध्ये पुरातत्व विभागाने नोंद केलेली आहे. पुण्यात अनेक वर्षापासून हिंदू,मुस्लिम, शिख आणि विविध धर्मीय राहत आहेत. त्या शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.खासदार मेधा ताई तुमच्या बापाचा हा शनिवारवाडा नसून आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. पोलिसांना विनंती आहे की तुम्ही जर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर, मेधा ताईसह पोलिसांना कोर्टात खेचू, असं यावेळी ठोंबरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com