Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Kalyan News : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
Kalyan News
Kalyan News Saam tv
Published On
Summary

कल्याण शीळ रोडवर केडीएमसीच्या घंटागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट

निष्काळजी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शीळ रोडवरील टाटा पावर परिसरात आज सकाळी झालेल्या अपघाताने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका च्या घंटागाडीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार, घंटागाडी कचरा संकलनासाठी परिसरातून जात असताना दुचाकीस्वाराला समोरून धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

Kalyan News
Gajanan Vada Pav Dombivli : चाललंय काय? प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत आढळल्या अळ्या; ग्राहकांचा संताप

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ जखमीला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घंटागाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Kalyan News
Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरत असून, केडीएमसीच्या वाहनचालकांच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

या अपघातानंतर कल्याण परिसरात वाहतुकीच्या सुरक्षेबाबत आणि महानगरपालिकेच्या वाहनांच्या जबाबदारीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com